Home /News /money /

SBI च्या YONO ला यूजर्सचा जबरदस्त प्रतिसाद, गाठला विक्रमी टप्पा

SBI च्या YONO ला यूजर्सचा जबरदस्त प्रतिसाद, गाठला विक्रमी टप्पा

योनो एसबीआयने युजर्सनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 2017 मध्ये लाँच झालेल्या योनो एसबीआयला अधिक पसंती मिळाली आहे.

    मुंबई, 6 मार्च: स्टेट बँक ऑफ इंडियाचा SBI डिजिटल सेवा प्लॅटफॉर्म म्हणजेच योनोनेच्या यूजर्समध्ये मोठ्या संख्येनं वाढ झाली आहे. 2017 मध्ये सुरू झाल्यापासूनच योनोला यूजर्समध्ये सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म म्हणून पसंती मिळत आहे. यावर बँकिंग, खरेदी, जीवनशैली आणि गुंतवणुकविषयीच्या सर्व गरजा पूर्ण करता येतात. केवळ दोन वर्षांत योनो एसबीआयने 20 वेगवेगळ्या विभागांत 100 पेक्षा जास्त ई- कॉमर्स कंपन्यांशी भागिदारी केली आहे. ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतील असे विविध एसबीआयने योनोच्या (SBI YONO) माध्यमातून सुरू केले असल्यानं याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. योनो म्हणजेच 'यू ओन्ली नीड वन'. या योजनेनं 200 लाख नोंदणीकृत युजर्सचा टप्पा गाठला आहे. यात कॅश, योनो ग्लोबल आणि योनो कृषी, योनो शॉपिंग फेस्टिवहल यांचा समावेश आहे. एसबीआयने योनोवर आतापर्यंत 6.8 दशलक्ष एसबी खाती सुरू केली आहे. यात ग्राहकांना फक्त केवायसीसाठी बॅंकेच्या खात्याला भेट देऊन 24x7 चालणारे डिजिटल बचत खाते सुरू करता येतं. योनो एसबीआयच्या माध्यमातून बँक दररोज 20000 खाती उघडते. योनो कॅशने आतापर्यंत एटीएम आणि मर्चंट आउटलेटसवरील 250000 टचपॉइंट्सवरून सुरक्षित व्यवहार केले आहेत. 5 दशलक्ष व्यवहार हे एटीएम कार्डशिवाय केले आहेत. बँकेने गेल्या दोन वर्षांत 1 लाख एसबीआय क्रेडिट कार्ड्सही वितरित केली आहेत. वाचा - येस बँकेच्या खातेधारकांवर कोसळली कुऱ्हाड, फक्त 50 हजार काढण्याची मुभा केवळ 27 महिन्यांत योनो एसबीआयने ग्राहकांना 4 लाख जीवन विमा योजना आणि योनो कृषी अग्री सोने कर्ज म्युच्युअल फंड्सची विक्री केली आहे. 200 लक्ष नोंदणीकृत ग्राहकांचा टप्पा हे ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास असल्याचं एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटल आहे. योनो एसबीआय डिजिटल रुपांतरणाच्या मार्गावर असल्याची माहिती त्यांनी दिली. योनो एसबीआयला ग्राहकांचा प्रतिसाद 2017 मध्ये लाँच झालेल्या योनो एसबीआयला जबरदस्त प्रतिसाद योनोच्या माध्यमातून स्थापनेपासूनच एसबीआयने सुरू 6.8 दशलक्ष खाती केली. योनोचे डाउनलोड्स 430 लाखांच्या पुढे आहेत. बँकिंग आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्मवर दररोज 45लाखांवर लॉगइन्स होतात. योनो कॅश, योनो ग्लोबल आणि योनो कृषी असे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. आतापर्यंत 3.4 लाख योनो अ‍ॅग्री सोने कर्जाचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं आहे. हे वाचा : 1000 रुपयाची नवी नोट बाजारात? जाणून घ्या काय आहे सत्य
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Money, Online banking, YONO APP

    पुढील बातम्या