मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ऑनलाईन गांजा विक्री प्रकरण, Amazon India च्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

ऑनलाईन गांजा विक्री प्रकरण, Amazon India च्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

अॅमेझॉनने सांगितले होते की ते त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे बेकायदेशीर उत्पादनांची विक्री करण्यास परवानगी देत ​​​​नाही आणि ते या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

भोपाळ, 21 नोव्हेंबर : ऑनलाईन गांजा विक्री (Online Ganja Sale) रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी शनिवारी Amazon India च्या कार्यकारी संचालकांविरुद्ध (executive directors of Amazon India) गुन्हा दाखल केला. नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे गोड पदार्थ विकण्याच्या नावाखाली भांगाची विक्री केली जात होती. अॅमेझॉनने सांगितले होते की ते त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे बेकायदेशीर उत्पादनांची विक्री करण्यास परवानगी देत ​​​​नाही आणि ते या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत आहे.

भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, देशात ASSL म्हणून काम करणाऱ्या Amazon India च्या कार्यकारी संचालकांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्याच्या कलम 38 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ते म्हणाले की एफआयआरमध्ये कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव नाही. पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले की, 13 नोव्हेंबर रोजी ग्वाल्हेरचे रहिवासी बिजेंद्र तोमर आणि सूरज उर्फ ​​कल्लू पवैय्या यांच्याकडून 21.7 किलो गांजा जप्त केल्यानंतर जिल्ह्यातील गोहड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का?

ग्वाल्हेरचा आणखी एक रहिवासी मुकुल जैस्वाल आणि खरेदीदार चित्रा बाल्मिकी, मेहगाव, भिंड, यांना चौकशीदरम्यान अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. पवैया आणि जयस्वाल यांनी बाबू टेक्स नावाची कंपनी स्थापन करून अॅमेझॉनवर विक्रेता म्हणून नोंदणी केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी सांगितले की, ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून कंपनीमार्फत स्टीव्हिया विकण्याच्या नावाखाली गांजा पुरवठा करतात.

SBI Fraud Alert: बँक खात्यासंदर्भातली 'ही' माहिती कुणालाही सांगू नका; अन्यथा...

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने या गंभीर मुद्द्यावर केंद्र सरकारकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच Amazon विरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) कारवाई करावी, अशी मागणी केली होती, कारण ते विक्रेता म्हणून काम करत आहे.

First published:

Tags: Amazon, Crime