मराठी बातम्या /बातम्या /मनी /

व्हिस्कीच्या 550 रुपयांच्या बॉटलसाठी गेले 5.35 लाख रुपये, महिलेसोबत नेमकं काय घडलं?

व्हिस्कीच्या 550 रुपयांच्या बॉटलसाठी गेले 5.35 लाख रुपये, महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Cyber Crime : महिलेची व्हिस्कीच्या 550 रुपयांच्या बॉटलसाठी जवळपास 5.35 लाखांची फसवणूक झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. पोलीस या प्रकरणाच तपास करत आहेत.

Cyber Crime : महिलेची व्हिस्कीच्या 550 रुपयांच्या बॉटलसाठी जवळपास 5.35 लाखांची फसवणूक झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. पोलीस या प्रकरणाच तपास करत आहेत.

Cyber Crime : महिलेची व्हिस्कीच्या 550 रुपयांच्या बॉटलसाठी जवळपास 5.35 लाखांची फसवणूक झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. पोलीस या प्रकरणाच तपास करत आहेत.

    मुंबई, 12 ऑगस्ट : मुंबईतील एका महिलेला ऑनलाइन व्हिस्की विकत घेणे चांगलच महागात पडलं आहे. व्हिस्कीची होम डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने ऑनलाईन ठगांनी महिलेच्या खात्यातून 5.35 लाख रुपये गायब केले आहेत. महिलेने व्हिस्कीची होम डिलिव्हरी देणाऱ्या फर्मचा नंबर ऑनलाइन शोधला होता. स्वत:ला दारू दुकानाचे मालक आणि सेल्समन असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी महिलेची फसवणूक केली आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, ही महिला एका खासगी कंपनीत काम करते. केक सजवण्यासाठी आणि डिझाइन करण्यासाठी व्हिस्कीच्या बॉटलची तिला गरज होती. रात्री 9 वाजले असल्याने महिलेने ऑनलाइन दारू डिलिव्हरीसाठी इंटरनेटवर सर्च करून एक नंबर मिळवला. इथेच ती सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकली. पत्नीने घरातच दफन केला पतीचा मृतदेह; दुर्गंधी पसरल्यानंतर दिलं विचित्र कारण महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने इंटरनेटवरून व्हिस्की होम डिलिव्हरी करणाऱ्यांचे नंबर शोधले होते. फोन केल्यावर फोन उचलणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला दारू दुकानाचा मालक असल्याचे सांगितले. दुकान बंद आहे पण रात्री दारू त्यांच्या घरी पोहोचवली जाऊ शकते, असे त्याने सांगितले. QR कोडद्वारे 550 रुपये भरण्यास सांगितले. महिलेने सूचनेनुसार महिलेने क्यूआर कोडद्वारे 550 रुपये भरले. मग तिला सांगण्यात आले की डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह लवकरच तुम्हाला कॉल करेल. त्यानंतर सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून एका पुरुषाचा महिलेला फोन आला. 64 जणांच्या बाईक चोरल्या, सात जिल्ह्यांमधून पळवापळवी, पंढरपुरात सराईत टोळीचा पंचनामा त्या व्यक्तीने सांगितले की दारू घरपोच करण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे आणि दुकानातील व्यक्ती त्यांना यासाठी मदत करेल. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने महिलेला फोन करून ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. हे केल्यानंतर त्यांना लगेच फोनवर मेसेज आला की त्यांच्या खात्यातून 19,051 रुपये ट्रान्सफर झाले आहेत. महिलेने याबाबत कर्मचाऱ्याला सांगितले. यावर कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही. सिस्टममध्ये काही समस्या आहे आणि पैसे परत करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने महिलेकडे तिच्या बँक खात्याचे तपशील मागितले. पैसे परत मिळवण्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड तपशील शेअर करण्यास सांगितले. महिलेने कार्डच्या सीव्हीव्ही क्रमांकासह सर्व माहिती दिली. नंतर आरोपीने महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने 5 .35 लाख रुपये काढले. त्यानंतर आरोपीने फोन उचलणे बंद केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cyber crime, Online fraud

    पुढील बातम्या