कांदा पुन्हा झाला महाग, या कारणांमुळे जाऊ शकतो 140 रुपयांवर

कांदा पुन्हा झाला महाग, या कारणांमुळे जाऊ शकतो 140 रुपयांवर

नेहमीच कांदा 10 नोव्हेंबरपर्यंत भाजीबाजारात येतो पण यावर्षी पावसामुळे देशातल्या काही भागात कांद्याचं पीक खराब झालं. या महिन्याच्या शेवटी बाजारात नवा कांदा येण्याची अपेक्षा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : कांद्याच्या वाढत्या किंमती कमी होण्याची चिन्हं नाहीत. आशियामधली सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याच्या किंमती 113 रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. या किंमती अशाच वाढत राहिल्या तर त्या 130 ते 140 रुपयांवर जाऊ शकतात.

देशभरातल्या भाजीबाजारात कांद्याची आवक अजून वाढलेली नाही. कांदा बाजारात उशिरा येत असल्यामुळे पुरवठाही करणं शक्य होत नाही. त्यामुळे किंमती वाढल्या आहेत. मागच्या काही आठवड्यांत देशातल्या बहुतांश शहरांत कांद्याच्या किंमतीत 40 टक्के वाढ झाली आहे.

घाऊक बाजारात भाव वाढले

नाशिकजवळच्या लासलगाव भाजी मंडईत कांदा 9800 रुपये ते 11300 रुपये प्रतिक्विंटल झाला. त्याचवेळी पिंपळगावच्या मंडईत कांद्याचे भाव 9700 रुपये ते 10400 रुपये प्रतिक्विंटल झालेत.

ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातल्या घाऊक बाजारात कांदा सोमवारच्या 75 ते 85 रुपयांच्या तुलनेत 90 रुपये प्रतिकिलो झाला.

(हेही वाचा : सोन्याला नवी झळाळी, चांदीची चमकही वाढली, हे आहेत आजचे दर)

बाजारात कांद्याची उपलब्धता कमी आहे आणि शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठा कमी असल्याने पुरवठ्यामध्ये घट आणि किंमतीत वाढ होईल.

नेहमीच कांदा 10 नोव्हेंबरपर्यंत भाजीबाजारात येतो पण यावर्षी पावसामुळे देशातल्या काही भागात कांद्याचं पीक खराब झालं. या महिन्याच्या शेवटी बाजारात नवा कांदा येण्याची अपेक्षा आहे.

कांद्याचे दर का वाढले?

गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ हे कांद्याचे भाव वाढण्याचं आणखी एक कारण आहे. राज्यात पहिल्यांदा ऑगस्ट आणि नंतर ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये कांदा लावला जातो. ऑगस्टमध्ये पेरलेला कांदा नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये तयार होतो. त्याचवेळी नोव्हेंबरमधला कांदा मार्च-एप्रिलमध्ये तयार होतो. मागच्या वर्षी दुष्काळ पडल्याने पाणीटंचाई होती आणि भावही कमी मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड कमी केली.

===================================================================================

First published: December 3, 2019, 5:31 PM IST
Tags: moneyonion

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading