मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच शेतकऱ्यांचे हाल झाले. यंदा या सगळ्यातून सावरत असताना आता अस्मानी संकट कोसळलं आणि बळीराजा पार कोलमडून गेला. राज्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्यं पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेली पिकं महापुराच्या पाणीत गेली. तर काही पिकं जमीनदोस्त झाली.
काही पिकांवर शेतकऱ्याने स्वत:च ट्रॅक्टर फिरवला आहे. हे कमी होतं की काय आता मावा रोगाचा प्रादूर्भाव कांद्यावर आला आहे. अतिवृष्टीमुळे मनमाड परिसरातील शेकडो हेक्टरवरील कांदा रोपावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला आहे. महागडी औषधांची फवारी करून रोपे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.
Onion benefits : लाल की पांढरा, आरोग्यासाठी कोणता कांदा चांगला?
मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळचा परिणाम कांदा रोपावर झाला असून शेतात पाणी तुंबल्याने शेकडो हेक्टर वरील कांदा रोप करपा,मावा सारख्या रोगाच्या विळख्यात सापडल्या आहे.
शेतकरी हवालदिल झाला असून महागडी औषधांची फवारणी करून कांदा रोपे वाचविण्यासाठी बळीराजा धडपड करत आहे. आधीच कांदा महाग होण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात कांद्यासाठी 30 ते 40 रुपये किलोमागे नागरिकांना मोजावे लागत आहेत.
Onion Rate : भविष्यात कांद्याचा वांदा होऊ नये म्हणून केंद्राची आतापासूनच तयारी काय आहे पूर्ण योजना?
नवीन काढणीला आलेला कांदाच पावसानं आणि या रोगानं वाया जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता आहे. त्यासोबतच आता कांद्याचे दरही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेटही कोलमडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Onion