फक्त एक रुपयाचं नाणं तुम्हाला बनवेल करोडपती, मिळवून देईल 10 कोटी; कसं ते वाचा

फक्त एक रुपयाचं नाणं तुम्हाला बनवेल करोडपती, मिळवून देईल 10 कोटी; कसं ते वाचा

तुमच्याजवळील नाण्याचा खजिना धुंडाळा आणि त्यात तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं (One rupee coin) सापडतं का ते पाहा.

  • Share this:

दिल्ली, 06 एप्रिल: लहानपणी अनेकांना जुनी नाणी (Coin Collection), नोटा जमा करण्याचा छंद असतो. पण फार थोडे लोक तो पुढेही कायम जपतात. वय वाढेल तसा बहुतेकांचा हा छंद मागे पडत जातो. अर्थात या छंदामागे पैसे कमावण्याचा उद्देश नसतो त्यामुळे बालपणीच्या या छंदाकडे गांभीर्यानं बघणारे लोक कमीच असतात. आता कोणी सांगितलं की तुमच्याकडच्या जुन्या नाण्यांच्या संग्रहात अमूक प्रकारचे दुर्मिळ नाणं असेल तर तुम्हाला कोट्यवधी रुपये मिळतील तर अनेकांना हे पटणारही नाही किंवा हा छंद सोडून दिलेल्या अनेकांना हळहळही वाटेल.

दुर्मिळ नाणी, नोटा यांच्या लिलावातून (Auction) अनेकदा लाखो, कोट्यवधी रुपये मिळतात. ही जुनी नाणी आपल्याला मालामाल करू शकतात. सध्या एक रुपयाच्या (One rupee coin) एका दुर्मिळ नाण्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार हे नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 10 कोटी रुपये मिळू शकतात.

1885 मधील हे एक रुपयांचं नाणं आहे. या नाण्याला  लिलावात दहा कोटींपर्यंतची किंमत मिळत आहे. इंग्रजांच्या काळातील (British Rule) या एक रुपयाच्या नाण्यावर इसवी सन 1885 असं लिहिलेलं असणं अपेक्षित आहे.  असं नाणं असेल तर ते ऑनलाइन लिलावासाठी (Online Auction) ओएलएक्सवर (OLX) टाकावे लागेल. इंडिया मार्ट (indiamart.com) या वेबसाइटवरही त्याचा लिलाव करता येईल.

हे वाचा - UPI Transaction फेल झाल्यास इथं तक्रार करा; बँकेकडून मिळेल भरपाई

यासाठी या वेबसाइटसवर जाऊन तुमची माहिती भरून तुमचं एक अकाउंट उघडा. त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या या दुर्मिळ नाण्याचे वेगवेगळे फोटो काढा आणि तुमच्या अकाउंटवर ते फोटो शेअर करा. या नाण्याची माहिती द्या आणि विक्रीसाठी (Online Sale) हे नाणं टाकत असल्याचं जाहीर करा. .

ओएलएक्सवर अनेक लोक दुर्मिळ नाणी, वस्तू यांची वाटेल तेवढी किंमत देऊन खरेदी करतात. दुर्मिळ वस्तूंचे चाहते, संग्राहक अशा दुर्मिळ वस्तूंच्या शोधातच असतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित वस्तू मिळाली की ते चांगली किंमत घेऊन ती खरेदी करतात. एक रुपयाच्या विशिष्ट नाण्यालाही सध्या मागणी असून, दहा कोटींपर्यंत किंमत मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक नाण्याला हीच किंमत मिळेल असं नाही. हे त्या वेळच्या खरेदीदारावर अवलंबून असू शकते.

हे वाचा - तु्म्ही खरेदी केलेलं GOLD असली की नकली? घरच्या घरी या पद्धतीने करा सोन्याची पारख

तुमच्याजवळ अशी दुर्मिळ नाणी, नोटा, वस्तू असतील तर ऑनलाइन लिलावात त्याला नक्कीच लाखो, कोटी रुपये मिळू शकतात, हे लक्षात ठेवा. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा जुन्या नाण्याचा खजिना धुंडाळा आणि तुम्हाला कोट्याधीश करणाऱ्या या जादूच्या नाण्याचा शोध घ्या.

First published: April 6, 2021, 10:09 PM IST

ताज्या बातम्या