मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Ration Card मध्ये नाव जोडणीबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश; 'या' वंचित घटकासाठी घेतला निर्णय

Ration Card मध्ये नाव जोडणीबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश; 'या' वंचित घटकासाठी घेतला निर्णय

रेशन कार्ड भारत सरकारकडून मान्यताप्राप्त सरकारी डॉक्यूमेंट आहे. रेशन कार्डच्या साहाय्याने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य, बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किंमतीत रेशन दुकानांतून खरेदी करता येतं.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन (Lockdown) जाहीर झाल्यानंतर, अनेक सेक्टर्सवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनलॉकमध्येही (Unlock) काही सेक्टर्सवर परिणाम होत आहे. सेक्स वर्करलाही (Sex Workers) कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अशात आता गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टने (Supreme Court) या सेक्स वर्कर्ससाठी, केंद्र सरकारसह (Central Government)सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारलाही खास निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व राज्य सरकारला सेक्स वर्कर्ससाठी रेशन धान्य मोफत उपलब्ध करण्याचा आदेश जारी केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून सेक्स वर्कर्सचं रेशन कार्ड बनवण्यात येत आहे. झारखंड सरकारने 12 हजारहून अधिक सेक्स वर्कर्ससाठी रेशन कार्ड उपलब्ध (Ration Card) करण्याचा निर्णय लागू केला आहे.

सरकारकडून पेन्शनर्ससाठी दिवाळी गिफ्ट; केवळ ७० रुपयांत घ्या या सेवेचा लाभ

सेक्स वर्कर्सलाही मिळणार मोफत रेशन -

देशातील सर्व राज्य सरकार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदांतर्गत (National Food Security Act) सेक्स वर्कर्सला मोफत रेशन देणार आहे. सेक्स वर्कर्सला यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला यासाठीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सेक्स वर्कर्सची ओळख आणि पत्ता गोपनीय ठेवला जाणार आहे.

झारखंड सरकारकडून सेक्स वर्कर्ससाठी सुविधा -

राज्य सरकार सेक्स वर्कर्सलाही दर महिन्याला रेशन धान्य देणार आहे. यासाठी राज्यातील सर्व उपायुक्तांना, सेक्स वर्कर्सचं रेशन कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. झारखंड सरकारच्या www.aahar.jharkhand.gov.in पोर्टलवर सेक्स वर्कर्स ऑनलाईन अर्ज करू शकतात.

160 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळवा 23 लाख, वाचा LIC ची नवी पॉलिसी

रेशन कार्ड भारत सरकारकडून मान्यताप्राप्त सरकारी डॉक्यूमेंट आहे. रेशन कार्डच्या साहाय्याने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य, बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किंमतीत रेशन दुकानांतून खरेदी करता येतं. रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, सरकारी बँक खातं, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही आयडी प्रूफ वापरता येऊ शकतो.

First published:

Tags: Ration card