Home /News /money /

Ration Card: रेशन कार्ड नसेल तरीही मोफत मिळेल अन्नधान्य, इथे वाचा सर्व प्रक्रिया

Ration Card: रेशन कार्ड नसेल तरीही मोफत मिळेल अन्नधान्य, इथे वाचा सर्व प्रक्रिया

कोरोना महामारीमुळे (Coronavirus in India) रोजगार गेल्याने अनेकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. पैसे नसल्यामुळे कुटुंबाला पुरेल एवढ्या धान्याची खरेदी करणंही काहींना शक्य होत नाही

नवी दिल्ली, 22 जानेवारी: कोरोना महामारीमुळे (Coronavirus in India) रोजगार गेल्याने अनेकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. पैसे नसल्यामुळे कुटुंबाला पुरेल एवढ्या धान्याची खरेदी करणंही काहींना शक्य होत नाही. वन नेशन, वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card) ही योजना केंद्र सरकारतर्फे (Modi Government) काही राज्यांमध्ये लागू करण्यात आली असून, तिथे अन्य राज्यांतल्या रेशन कार्डवरही मोफत रेशन (Free Ration) दिलं जात आहे. त्यामुळे तिथल्या रेशन कार्डधारकांना थोडाफार आधार मिळाला आहे. त्यातच रेशन कार्डच्या लाभार्थ्यांसाठी दिल्लीमधून आनंदाची बातमी आली आहे. कारण आता दिल्लीमध्येही (Delhi-NCR) दुसऱ्या राज्यातल्या रेशन कार्डधारकालासुद्धा मोफत धान्य मिळण्यास सुरुवात झाली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातल्या अनेक राज्यांमध्ये मोफत रेशन देत आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही 'वन नेशन वन रेशन कार्ड' (One Nation One Ration Card Scheme) ही योजना लागू झाल्यानंतर इतर राज्यांतल्या नागरिकांनाही मोफत रेशन मिळण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड या राज्यांमध्ये रेशन कार्ड नसतानाही मोफत रेशन दिलं जात आहे. मोफत रेशन मिळवण्याची ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या. हे वाचा-Instagram देखील आता राहणार नाही फ्री! या फीचरसाठी तुम्हाला मोजावे लागणार पैसे 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेअंतर्गत अन्नधान्याचं वितरण आता सर्व ई-पीओएसद्वारे केलं जात आहे. आता याअंतर्गत लाभार्थ्यांना कार्ड नसतानाही मोफत रेशन मिळणार आहे; मात्र यासाठी तुमचं कार्ड आधार किंवा बँकेशी लिंक करणं अनिवार्य आहे. याशिवाय, दिल्ली सरकारने अशी सुविधा दिली आहे की, तुमची प्रकृती ठीक नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही रेशन दुकानात जाऊ शकत नसाल, तर तुमच्या जागेवर म्हणजे तुमच्या कार्डवर घरातली इतर कोणतीही व्यक्ती रेशन उचलू शकते. दरम्यान, देशात नवीन रेशन कार्डसह जुन्या रेशन कार्डमध्ये नाव जोडण्याचं, कमी करण्याचं कामही सुरू आहे. यासाठी तुमचं रेशन कार्ड आधार किंवा बँक अकाउंटशी लिंक असणं आवश्यक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरमध्ये सस्पेंड कार्डदेखील नुकतीच लिंक करण्यात आली आहेत. हे वाचा-नोकरीदरम्यान करा गुंतवणूक, निवृत्तीपर्यंत बना कोट्यधीश! काय आहे योजना? स्वतःच्या मूळ गावापासून इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना यापूर्वी रेशनकार्ड असूनदेखील बऱ्याचदा रेशन मिळत नव्हतं. त्याबाबत राष्ट्रीय स्तरावर एकच रेशनकार्ड असावं, अशी योजना केंद्र सरकारने तयार केली होती. या योजनेला सातत्याने चालना दिली जात आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमुळे देशभरात कुठल्याही मान्यताप्राप्त रेशन वाटप दुकानातून रेशन मिळणं शक्य होऊ लागलं आहे. या योजनेमुळे आता दिल्लीमध्येही इतर राज्यांतल्या रेशन कार्ड लाभार्थ्यांना रेशन मिळू शकणार आहे.
First published:

Tags: Ration card

पुढील बातम्या