Home /News /money /

ATM मधून फाटक्या नोटा आल्या? अशा मिळतील बदलून, वाचा सविस्तर

ATM मधून फाटक्या नोटा आल्या? अशा मिळतील बदलून, वाचा सविस्तर

अनेकदा एटीएममधून पैसे काढल्यावर (One can exchange damaged notes came out from ATM) त्यातील काही नोटा फाटक्या किंवा खराब असल्याचा अनुभव येतो.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : अनेकदा एटीएममधून पैसे काढल्यावर (One can exchange damaged notes came out from ATM) त्यातील काही नोटा फाटक्या किंवा खराब असल्याचा अनुभव येतो. अशा वेळी या नोटा परतही (No one accepts damaged notes) करता येत नाहीत आणि बाजारातही त्या नोटा कुणीच स्विकारत नाही. अशा नोटांचं नेमकं काय करायचं, असा प्रश्न आपल्याला पडतो. पाकिटात दिवसेंदिवस या नोटा पडून राहतात आणि त्याचं नेमकं काय करावं, या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. मात्र या प्रश्नाचं (Damaged notes can be changed) उत्तर आहे. जर तुम्हाला एटीएममधून फाटक्या नोटा मिळाल्या, तर त्या बदलून घेता येतात. फक्त त्यासाठी एक रितसर प्रक्रिया करणं गरजेचं असतं. अशा बदला नोटा ज्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही पैसे काढले आहेत, त्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला नोटा बदलता येऊ शकतात. मात्र त्यासाठी त्या नोटा तुम्हाला त्या बँकेच्या एटीएममधून मिळाल्या आहेत, याचे पुरावे द्यावे लागतील. हे दोन प्रकारे करता येऊ शकले. त्यासाठी तुम्हाला एटीएममधून पैसे काढल्यानंतर मिळणारी रिसीट दाखवावी लागेल. आता अनेकजण कागद वाचवण्यासाठी ही रिसिट घेत नाहीत. अनेकदा एटीएममधील कागद संपलेले असतात, त्यामुळे रिसीट मिळतच नाही. अशा वेळी तुम्हाला आलेला बँकेचा एसएमएस तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर बँकेकडून तुम्हाला नोटा बदलून मिळतील. हे वाचा- 10 मिनिटांच्या भेटीत काय झाला बापलेकात संवाद?आर्यनला गजाआड पाहताच शाहरुख भावुक नोटा बदलून देणं बंधनकारक फाटक्या नोटा बदलून देणं, ही बँकांची जबाबदारी असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. कुठलीही बँक फाटक्या नोटा बदलून द्यायला नकार देऊ शकत नाही, असंही आरबीआयनं म्हटलं आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी एजन्सीकडे देण्यात येत असली, तरी फाटक्या नोटांची जबाबदारी मात्र बँकेचीच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यापुढे फाटक्या नोटा मिळाल्या, तर ताबडतोब बँकेच्या शाखेला भेट देऊन त्या बदलून घेणं शक्य होणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: ATM, Bank

    पुढील बातम्या