Valentine's Day निमित्त SBI ची खास ऑफर, गिफ्ट्स खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट

Valentine's Day निमित्त SBI ची खास ऑफर, गिफ्ट्स खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट

आज Valentine's Day निमित्त तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी काही खास खरेदी करू इच्छित आहात तर देशातील सर्वात मोठी बँक असणारी SBI तुम्हाला एक खास सवलत देत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी: आज संपूर्ण जग व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day) साजरा करत आहे. या निमित्त तुम्ही देखील तुमच्या पार्टनरसाठी काही खास खरेदी करू इच्छित आहात तर देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) तुम्हाला एक खास सवलत देत आहे. गिफ्ट शॉपिंगवर तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. तुम्हाला याकरता SBI Yono App वापरावे लागेल. आयपीजी डॉट कॉमवर योनोच्या माध्यमातून खरेदी केल्यास तुम्ही 20 % पर्यंत सूट मिळेल. याकरता तुम्हाला IGPSBI हा कोड वापरावा लागेल.

फर्न्स एन पेटल्सवर खरेदी केल्यानंतर तुम्हाला 200 रुपयांची सूट मिळेल. यासाठी ग्राहकांना YONO 200 कोड वापरावा लागेल. याचप्रमाणे झूमइनवर खरेदी केल्यानंतर फ्लॅट 35 टक्के डिस्काउंट आहे, याकरता तुम्हाला YONO 35 कोड वापरावा लागेल.

(हे वाचा-इंधनवाढीबाबत पेट्रोलियम मंत्र्यांनी सोडलं मौन, या गोष्टीवर फोडलं खापर)

यानंतर तुम्ही जर डेली ऑब्जेट वेबसाइटच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर 35 टक्के सूट मिळेल. याकरता तुम्हाला DOSBI35 कोड वापरावा लागेल. वुहूच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी 50 टक्क्यापर्यंत सूट मिळवू शकता. याकरता GIFTCARDS प्रोमो कोड वापरता येईल. टायटनपे वर युजर्सना 10 टक्केपर्यंत डिस्काउंट मिळेल. ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्ही TITANPAY10 कोड वापरा.

एसबीआयने ट्वीट करून दिली माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.

कशी मिळवाल ऑफर?

>> तुम्हाला सर्वात आधी तुमच्या SBI YONO अकाउंटवर लॉगइन करावं लागेल.

>> यानंतर Shop & Order वर क्लिक करून खरेदी करायची आहे.

(हे वाचा-2.8 लाख लोकांना मिळेल रोजगार, ही परदेशी कंपनी भारतात लवकरच सुरू करणार युनिट)

>> तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तूंवर याठिकाणी 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.

>>याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.sbiyono.sbi/index.html या वेबसाइटला भेट देऊ शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 14, 2021, 2:42 PM IST

ताज्या बातम्या