• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Budget 2021: अर्थसंकल्पाच्या दिवशी 10 लाख रुपये जिंकण्याची संधी; मात्र त्यासाठी करावं लागेल 'हे' काम

Budget 2021: अर्थसंकल्पाच्या दिवशी 10 लाख रुपये जिंकण्याची संधी; मात्र त्यासाठी करावं लागेल 'हे' काम

Budget 2021 CRED

Budget 2021 CRED

तुम्हालाही 10 लाख रुपये जिंकायचे असल्यास ही बातमी नक्की वाचा.

  • Share this:
नवी दिल्ली, 31 जानेवारी : क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल भरण्यासाठी सर्वात सोपा उपाय असलेल्या क्रेड (CRED) अ‍ॅपने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. सध्या हे अ‍ॅप बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून केंद्रीय अर्थसंकल्पाच्या(Union Budget) दिवशी कंपनीने खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही 2019-20 या आर्थिक वर्षातील तुमचा भरलेला आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स (Income Tax) पुन्हा मिळवू शकता. यासाठी विशिष्ट रकमेची मर्यादा असून या दिवशी तुम्ही या अ‍ॅपवरून क्रेडिट कार्डचे बिल भरल्यास तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे. परंतु ज्यांचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला आहे त्याच क्रेडिट कार्ड धारकांना या योजनेमध्ये ही रक्कम जिंकता येणारे आहे. भाग्यशाली विजेता जिंकणार 10 लाख रुपये 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला जाणार आहे. या दिवशी क्रेड (CRED) अ‍ॅपवरून आपल्या क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल भरणाऱ्या एका भाग्यशाली विजेत्याला 10 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. परंतु ही रक्कम तुम्हाला आयकराच्या सुटीच्या रूपात मिळणार आहे. तुम्ही भरलेला तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax) जर 10 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला ती पुन्हा परत मिळणार आहे. या दिवशी ज्या व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) 750 हुन अधिक आहे त्यांनी क्रेडिट पेमेंट केलं तर त्यांना ही रक्कम जिंकण्याची संधी आहे. परंतु यामध्ये केवळ एकाच भाग्यशाली विजेत्याला ही रक्कम जिंकण्याची संधी आहे. मिळालेल्या माहितीनुसार 59 लाख क्रेडिट कार्ड धारक या अ‍ॅपचा वापर करत असून यामधील अनेकांना या योजेमध्ये ही रक्कम जिंकण्याची संधी आहे.

हे देखील वाचा - LPG गॅसच्या किंमतीपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत, फेब्रुवारीपासून बदलणार हे 5 नियम

CRED अ‍ॅप काय आहे क्रेड अ‍ॅपमधून तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता. या अ‍ॅपमधून तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरल्यास तुम्हाला कॅशबॅक (Cashback) आणि क्रेड कॉईन (Cred Coin) देखील मिळतात. फ्रीचार्ज चे को-फाउंडर कुणाल शाह यांनी 2018 मध्ये क्रेड या अ‍ॅपची निर्मिती केली होती. यामध्ये तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे बिल भरल्यास विविध कंपन्या तुम्हाला रिवार्ड पॉईंट देखील देतात. तुम्ही जितक्या रकमेचं बिल भरता जितके क्रेड कॉईन(Cred Coin) तुमच्या खात्यात जमा होतात. महत्त्वाचे म्हणजे या अ‍ॅपवरून तुम्ही घरभाडे देखील भरू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागतो.
Published by:news18 desk
First published: