Home /News /money /

अक्षय तृतीयेदिवशी घरबसल्या खरेदी करा सोनं, हे ज्वेलर्स देत आहेत खास ऑफर

अक्षय तृतीयेदिवशी घरबसल्या खरेदी करा सोनं, हे ज्वेलर्स देत आहेत खास ऑफर

गेल्यावर्षीपेक्षा अक्षय तृतीया दिवशी होणाऱ्या सोन्याच्या विक्रीमध्ये यावर्षी 15 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी सोन्याची विक्री सुरू व्हावी याकरता सराफांकडून ऑनलाइनचा पर्याय वापरण्यात येत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशातील सराफा बाजार बंद आहे. त्याचा परिणाम अक्षय तृतीयेला देशभरात होणाऱ्या सोन्याच्या विक्रीवर होणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा अक्षय तृतीया दिवशी होणाऱ्या सोन्याच्या विक्रीमध्ये यावर्षी 15 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी सोन्याच्या दागिन्यांची विक्री अक्षय तृतीयेदिवशी मोठ्या प्रमाणात होते. त्यामध्ये यावर्षी घट होणार असल्याने सोने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तरी सुद्धा सोन्याच्या दागिन्यांची विक्री व्हावी याकरता या सराफांकडून विविध उपाय राबवले जात आहे. काही वेगवेगळ्या ऑफर्स सोने व्यापाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. आता पैसे भरायचे आणि लॉकडाऊन संपल्यानंतर डिलिव्हरी ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन अनंत पद्मनाभन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात कोव्हिड 19 (COVID-19)मुळे सोन्याची सर्व दुकानं बंद आहेत. मात्र काही ज्वेलर्स वैयक्तिक पातळीवर ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जस की, 'आता बुक करायचं आणि पैसे भरायचे आणि लॉकडाऊन संपल्यानंतर सोन्याची डिलिव्हरी मिळणार', अशा पद्धतीच्या ऑफर्स अनेक ज्वेलर्सनी देऊ केल्या आहेत. (हे वाचा-लॉकडाऊनंतर कधीपासून सुरू होणार रेल्वे? जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लॅन) या ऑफर्सना ग्राहक काय प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पद्मनाभन पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात ऑनलाइन खरेदीचा वेग वाढणारा असला तरीही सोनं खरेदी करताना त्याला स्पर्श करणे आणि दागिने घालून पाहण्याला नेहमीच ग्राहकांची पसंती राहील. ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून होणार सोन्याची विक्री कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष टी.एस. कल्याणरमन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे ग्राहक लॉकडाऊनच्या काळातही अक्षय तृतीयेदिवशी सोन्याची खरेदी करू इच्छितात. ते म्हणाले की दरवर्षी या दिवशी स्टोअरमध्ये सर्वाधिक गर्दी असते. पण यावर्षी लॉकडाऊनमुळे दुकानं बंद असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी गोल्ड ओनरशिप सर्टिफिकेट पर्याय त्यांनी उपलब्ध केला आहे. या सर्टिफिकेटची खरेदी त्यांच्या वेबसाइटवरून करता येईल. अक्षय तृतीये दिवशी हे प्रमाणपत्र ग्राहकांना ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवण्यात येईल. जेणेकरून अक्षय तृतीये दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा कायम राहील. (हे वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा सर्वात मोठा फटका, मिळणार नाही वाढीव महागाई भत्ता) सेनको गोल्ड अँड डायमंडचे कार्यकारी संचालक सुवनकर सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहक सांकेतिक खरेदी करू शकतात. याकरका आम्ही ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवला आहे. तनिष्कची खास ऑफर लॉकडाऊनमुळे शोरूम बंद असल्यामुळे टाटांचा ज्वेलरी ब्रँड तनिष्कने सुद्धा सोन्याच्या दागिन्यांच्या ऑनलाइन विक्रीवर भर दिला आहे. कंपनीच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर 18 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत अक्षय तृतीयेसाठी खास विक्री सुरू आहे. www.tanishq.co.in वर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. यावर खरेदी केलेली ज्वेलरी लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन किंवा घरी डिलिव्हरी मागून ताब्यात घेऊ शकता. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या