Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला; वाचा काय आहे आजचा गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला; वाचा काय आहे आजचा गोल्ड रेट

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयांत आलेल्या मजबूतीमुळे मौल्यवान धातूच्या दरात घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : भारतीय बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) सोमवारी काहीशी घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 15 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचा भाव 19 रुपयांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) 646 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ झाली आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 68,426 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Markets) सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीचा दर वधारला आहे. सोन्याचे आजचे नवे दर (Gold Price, 15 February 2021) - दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 19 रुपयांनी घसरला असून दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर आता 46,826 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात गोल्ड रेट 46,845 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीचा नवा दर(Silver Price, 15 February 2021) - सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीचा भाव 646 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढून 69,072 इतका झाला आहे.

    (वाचा - Gold Price Today: सोने-चांदी दरात आतापर्यंत 10000 रुपयांची घसरण; वाचा गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती?)

    एचडीएफसी सिक्योरिटीचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयांत आलेल्या मजबूतीमुळे मौल्यवान धातूच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणामही भारतीय बाजारात सोन्याच्या दरांवर झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 च्या स्तरावर पोहोचले होते, त्यामुळे या सर्वोच्च स्तरावरुन आता सोन्याचे दर 10,000 रुपयांनी कमी झाले आहेत. याचबरोबर चांदीच्या दरात देखील मागील काही महिन्यांपासून 10,000 रुपयांची घसरण झाली आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या