मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मकरसंक्रांतीनिमित्त सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी मात्र स्ठिर, पाहा नव्या किंमती

मकरसंक्रांतीनिमित्त सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी मात्र स्ठिर, पाहा नव्या किंमती

मकरसंक्रांतीनिमित्त सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्याचे दर खाली आले आहेत.

मकरसंक्रांतीनिमित्त सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्याचे दर खाली आले आहेत.

मकरसंक्रांतीनिमित्त सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्याचे दर खाली आले आहेत.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 14 जानेवारी : भारतीय बाजारांमध्ये गुरुवारी मकरसंक्रांतीच्या (Makar sankranti) दिवशी 14 जानेवारी 2021 यादिवशी सोन्याच्या दरात (gold prices) घसरण नोंदवली गेली. दिल्लीच्या सराफा बाजारात (Delhi gold market) आज सोन्याच्या दरांमध्ये दर 10 ग्रॅममागे 369 रुपये इतकी घसरण नोंदवली गेली. सोबतच चांदीच्या किंमतीतही (silver prices) 390 रुपये प्रती किलोग्रॅमची नाममात्र घसरण झाली. मागील व्यवसाय सत्रादरम्यानही दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 48,757 रुपये प्रती 10 ग्रॅमवर येऊन थांबलं होतं. आणि चांदी 64,924 रुपये प्रती किलोग्रॅमवर होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International market) सोन्याचा भाव आज खाली पडला. चांदीची किंमत मात्र जेवढ्यास तेवढी राहिली. दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमती रुपये 369 प्रती 10 ग्रॅम इतक्या घटल्या. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धता असणाऱ्या सोन्याचा भाव आता 48,388 रुपये प्रती 10 ग्रॅम इतका झाला आहे. याआधीच्या व्यावसायिक सत्रादरम्यान सोन्याचा भाव 48,757 रुपये प्रती 10 ग्रॅमवर येऊन थांबला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आता कमी होऊन 1,842 डॉलर्सवर (dollars) प्रती औंसवर पोचला आहे. हे ही वाचा-'पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळल्यास देशाला होईल 1 लाख कोटींचा फायदा' चांदीबाबत बोलायचं झालं तर गुरुवारी चांदीच्या किमतीतही नाममात्र घसरण नोंदवली गेली. दिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदीच्या किमतीमध्ये 390 रुपये प्रती किलोग्रॅम घट झाली. आता चांदीची किंमत 64,534 रुपये प्रती किलोग्रॅमपर्यंत पोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव 25.21 डॉलर प्रती औंस वर जशाला तसा राहिला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या सिनियर अनॅलिस्टच्या (senior analyst) मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीचा प्रभाव भारतीय बाजारांवरही पडला. ते म्हणाले, की अमेरिकन डॉलर सशक्त झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोन्याची किंमत घटते आहे. शिवाय जगभरात वाढत कोरोना व्हायरसच्या केसेसमुळे गुंतवणूकदार (investor) अधिकच सावध झाले आहेत. आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या रूपात ते सोन्यामध्ये पैसा गुंतवत आहेत.
First published:

Tags: Gold, Silver

पुढील बातम्या