Home /News /money /

Gold Price Today: बजेटच्या दिवशी सोने-चांदी दरात वाढ, किती महागलं सोनं

Gold Price Today: बजेटच्या दिवशी सोने-चांदी दरात वाढ, किती महागलं सोनं

आज देशाचा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2022-23) होत आहे. बजेटच्या दिवशी सोने-चांदी (Gold-Silver Prices Today) दरात तेजी आहे.

    नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : आज देशाचा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2022-23) होत आहे. बजेटच्या दिवशी सोने-चांदी (Gold-Silver Prices Today) दरात तेजी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव (Gold Rate Today) 0.04 टक्क्यांनी वधारला आहे. तर चांदीच्या दरात (Silver price) 0.08 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 48000 हून कमी ट्रेड करतोय गोल्ड रेट - एप्रिल डिलीव्हरी गोल्डची किंमत आज 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 47,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदीच्या दरातही वाढीची नोंद झाली. आज 1 किलो चांदीचा भाव 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 61,025 रुपयांवर पोहोचला आहे. Goodreturns नुसार, आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold Price in Maharashtra) -
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई48980 रुपये48990 रुपये
    पुणे48980 रुपये48990 रुपये
    नाशिक48980 रुपये48990 रुपये
    नागपूर48980 रुपये48990 रुपये

    22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Price in Maharashtra) -

    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई44900 रुपये44900 रुपये
    पुणे44850 रुपये44850 रुपये
    नाशिक44850 रुपये44850 रुपये
    नागपूर45150 रुपये45500 रुपये

    चांदीचा दर (Silver Price in Maharashtra) -

    शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
    मुंबई60900 रुपये61300 रुपये
    पुणे60900 रुपये61300 रुपये
    नाशिक60900 रुपये61300 रुपये
    नागपूर60900 रुपये61300 रुपये

    हे वाचा - बजेटच्या दिवशी फोकसमधील स्टॉक्स, बंपर कमाई करु शकतात 'हे' शेअर; चेक करा लिस्ट

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - Budget 2022 : पुढील तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु करणार, अर्थमंत्र्यांची

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या