मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजारात 'ओमिक्रॉन'ची दहशत; पुढे बाजाराची हालचाल कशी असेल? तज्ज्ञांच मत काय?

शेअर बाजारात 'ओमिक्रॉन'ची दहशत; पुढे बाजाराची हालचाल कशी असेल? तज्ज्ञांच मत काय?

26 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2,528.86 अंकांनी म्हणजेच 4.24 टक्क्यांनी घसरून 57,107.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 738.3 अंकांनी किंवा 4.15 टक्क्यांनी घसरून 17,026.5 वर बंद झाला.

26 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2,528.86 अंकांनी म्हणजेच 4.24 टक्क्यांनी घसरून 57,107.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 738.3 अंकांनी किंवा 4.15 टक्क्यांनी घसरून 17,026.5 वर बंद झाला.

26 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2,528.86 अंकांनी म्हणजेच 4.24 टक्क्यांनी घसरून 57,107.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 738.3 अंकांनी किंवा 4.15 टक्क्यांनी घसरून 17,026.5 वर बंद झाला.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 नोव्हेंबर : शेअर बाजार शुक्रवारी 26 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय इक्विटी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. नवीन कोरोना वेरिएंटच्या भीतीने बाजारात भीती पसरली असून शुक्रवारच्या व्यवहारात निफ्टी 17000 च्या खाली घसरताना दिसला. युरोपीय देशांमध्ये नवीन कोरोना विषाणूची वाढत्या केसेस, वाढती महागाई आणि जगभरातील FII ची विक्री यामुळे बाजारावर विक्रीचा दबाव वाढला आहे. 26 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2,528.86 अंकांनी म्हणजेच 4.24 टक्क्यांनी घसरून 57,107.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 738.3 अंकांनी किंवा 4.15 टक्क्यांनी घसरून 17,026.5 वर बंद झाला.

नोव्हेंबरच्या सीरिजमध्ये निफ्टी 1.7 टक्क्यांनी घसरला आहे, तर सेन्सेक्स 2 टक्क्यांनी घसरला आहे. जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांवर नजर टाकली तर, गेल्या आठवड्यात बीएसई ऑटो इंडेक्स (BSE Auto Index) 8 टक्के आणि रियल्टी इंडेक्स (Realty Index) 6.8 टक्क्यांवर बंद झाला आहे, तर टेलिकॉम (Telecom) आणि हेल्थकेअर निर्देशांक (Healthcare Index) हिरव्या चिन्हात बंद झाले आहेत. BSE मिडकॅप निर्देशांक 4 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

तर स्मॉलकॅप निर्देशांक (Smallcap Index) 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. या घसरणीतही 41 स्मॉलकॅप निर्देशांक आहेत, ज्यात 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामध्ये Aurum Proptech, Jaiprakash Associates, R Systems International, Tata Teleservices (Maharashtra), Trident, Brightcom Group, GRM Overseas, Elgi Equipments आणि Urja Global या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

Personal Loan: पर्सनल लोन घ्यायचंय; 'या' बँकांमध्ये सर्वात कमी व्याजदर

दुसरीकडे, 17 स्मॉलकॅप शेअर्स आहेत ज्यात 10 -17 टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामध्ये PVR, Lemon Tree Hotels, 63 Moons Technologies, Sequent Scientific, Godawari Power & Ispat, Force Motors, Bodal Chemicals, Monte Carlo Fashions आणि Shoppers Stop यांचा समावेश आहे.

आजपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात बाजाराची वाटचाल कशी असेल?

शेअरखानचे गौरव रतनपारखी म्हणतात की निफ्टी 17200 आणि 17000 च्या महत्त्वाच्या सपोर्ट झोनच्या अगदी जवळ आला आहे. आता असे दिसते की जोपर्यंत निफ्टी 17000 च्या वर राहील. तोपर्यंत या सपोर्ट झोनच्या वरती रिकव्हरी अपेक्षित आहे. दुसरीकडे, जर निफ्टी क्लोजिंग बेसिसवर 17000 च्या खाली गेला तर आपण तो 16700 च्या खाली जाताना पाहू शकतो.

या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक

सॅमको सिक्युरिटीजच्या (Samco Securities) येशा शाह सांगतात की, दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर बाजार आता मायक्रो आकडे आणि महागाईच्या आकडेवारीवर लक्ष ठेवेल. याशिवाय डिसेंबरमध्ये होणाऱ्या आरबीआय एमपीसीच्या बैठकीवरही बाजाराची नजर असेल. ते पुढे म्हणाले की येत्या आठवड्यात काही आयपीओची लिस्टिंग निराश झाल्यास, यामुळे बाजारातील लिक्विडिटी कमी होण्याचे संकेत स्पष्ट होतील. याशिवाय नोव्हेंबर महिन्यातील वाहन विक्रीच्या आकडेवारीचाही येत्या आठवड्यात बाजारावर परिणाम होणार आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणतात की कोरोनाच्या नवीन वेरिएंटच्या वाढत्या केसेसचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. पुढे, बाजाराची नजर ऑटो आणि जीडीपीच्या आकडेवारीवर असेल. कारण निफ्टी 17,150 च्या महत्त्वाच्या सपोर्टच्या खाली घसरला आहे. त्यामुळे आता त्याचा पुढील आधार 16700 च्या आसपास दिसत आहे. व्यापार्‍यांना सल्ला दिला जाईल की कोणत्याही बाऊन्सवर शॉर्ट पोझिशन घेण्याचे धोरण अवलंबावे, तर गुंतवणूकदारांनी या घसरणीच्या काळात मधूनमधून कमी प्रमाणात दर्जेदार स्टॉक खरेदी करण्याचे धोरण अवलंबावं.

First published:

Tags: Investment, Money, Share market