मराठी बातम्या /बातम्या /मनी /खरं की खोटं? 100 रुपयांची जुनी नोट इतिहासजमा होणार; RBI ने काय सांगितलं वाचा

खरं की खोटं? 100 रुपयांची जुनी नोट इतिहासजमा होणार; RBI ने काय सांगितलं वाचा

सध्या 100 रुपयांच्या नव्या नोटांसह जुन्या नोटाही (Rs 100 currency notes) चलनात आहेत.

सध्या 100 रुपयांच्या नव्या नोटांसह जुन्या नोटाही (Rs 100 currency notes) चलनात आहेत.

सध्या 100 रुपयांच्या नव्या नोटांसह जुन्या नोटाही (Rs 100 currency notes) चलनात आहेत.

मुंबई, 22 जानेवारी : तुमच्या खिशातील 100 रुपयांची नोट लवकरच गायब होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) 100 रुपयांच्या नोटांबाबत (Rs 100 currency notes) मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत. 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून काढण्याचा आरबीआयचा विचार आहे. जिल्हा स्तरीय बैठकीत आरबीआयनं (RBI) ही माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी सांगितलं, मार्च किंवा एप्रिलमध्ये 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा विचार आहे. जिल्हा स्तरीय सुरक्षा समिती (District Level Security Committee) आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समिती (District Level Currency Management Committee) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली, असं वृत्त फ्री प्रेस जर्नलनं दिलं आहे.

हे वाचा - Gold Rate Today: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, गुंतवणूकदारांना दिलासा

2019 मध्ये आरबीआयनं 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. पण तरी 100 रुपयांच्या जुना नोटाही ग्राह्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण आता  100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा विचार आहे. ज्यामुळे आपोआपच त्या चलनातून जातील, असं त्यांनी सांगितलं.

15 वर्षांपूर्वी 10 रुपयांचं नाणं आणण्यात आलं. पण अद्यापही ट्रेडर्स आणि व्यावसायिक ते स्वीकारत नाही आहेत. 10 रुपयांच्या नाण्याच्या कालावधीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे इतर बँक आणि आरबीआयसाठी ही मोठी अडचण ठरत आहे.

हे वाचा - Budget 2021: वर्क फ्रॉम होम केल्यास तुमच्या हातात येणार अधिक पगार? वाचा सविस्तर

लोकांनी 10 रुपयांच्या नाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा, यासाठी बँकांनी प्रयत्न करायला हवेत. लोकांना हे नाणं वापरण्यासाठी कसं  कसा होईल यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असंही बी. महेश यांनी सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Money, Rbi