• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 1 ऑक्टोबरपासून जुने चेक बुक अवैध; 'या' बँकांमध्ये खातं असेल तर तातडीने करा संपर्क

1 ऑक्टोबरपासून जुने चेक बुक अवैध; 'या' बँकांमध्ये खातं असेल तर तातडीने करा संपर्क

एक एप्रिल 2021पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात टप्प्याटप्प्याने आणखी काही बदल झाले. त्यानुसार आता एक ऑक्टोबर 2021पासून आणखी तीन मोठ्या बँकांची आधीची चेकबुक्स अवैध ठरणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक आणि अलाहाबाद बँक या बँकांचं विलीनीकरण एक एप्रिल 2019 आणि एक एप्रिल 2020 रोजी कार्यान्वित झालं. देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) यांचं बँक ऑफ बडोदामध्ये एक एप्रिल 2019 रोजी विलीनीकरण झालं. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) या बँका पंजाब नॅशनल बँकेत (PNB) विलीन झाल्या. त्यानंतर सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत (Canara Bank), तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक (Corporation Bank) युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली. विलीनीकरणाची ही प्रक्रिया (Bank Merger) टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर एक एप्रिल 2021पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात टप्प्याटप्प्याने आणखी काही बदल झाले. त्यानुसार आता एक ऑक्टोबर 2021पासून आणखी तीन मोठ्या बँकांची आधीची चेकबुक्स अवैध ठरणार आहेत. 'झी न्यूज'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. एक ऑक्टोबर 2021पासून अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या तीन बँकांची चेकबुक्स (Chequebooks) आणि MICR कोड अवैध होणार आहेत. या बँकांनी ग्राहकांना त्याबद्दलची माहिती दिली आहे. या बँकांची आधीची चेकबुक्स आणि MICR कोड चालण्याचा 30 सप्टेंबर 2021 हा शेवटचा दिवस असेल. सुरळीतपणे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी 1 ऑक्टोबरपूर्वीच आपल्या बँकेच्या शाखेतून नवी चेकबुक्स घेणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी ग्राहक इंटरनेट बँकिंग (Internet Banking) किंवा मोबाइल बँकिंगद्वारेही (Mobile Banking) अर्ज करू शकतात. काही बँकांच्या एटीएममधूनही (ATM) नव्या चेकबुकसाठी अर्ज करणं शक्य आहे. हे ही वाचा-SBI च्या या योजनेतून होईल मोठा फायदा, आज आहे स्कीमचा अखेरचा दिवस नवं चेकबुक मिळण्यासाठी ग्राहकांनी आपली आधीची बँक कोणत्या अँकर बँकेत विलीन झाली आहे, हे पाहून त्या बँकेकडे संपर्क साधावा. नवं चेकबुक मिळाल्यानंतर खातेधारकांनी जिथे जिथे आपला जुना बँक खाते क्रमांक दिला आहे, तिथे तिथे नवा बँक खाते क्रमांक, तसंच IFSC आणि MICR कोड अपडेट करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून गैरसोय टळू शकेल. म्युच्युअल फंड्स, ट्रेडिंग अकाउंट्स, जीवन विमा पॉलिसी, इन्कम टॅक्स अकाउंट, एफडी अकाउंट, आरडी अकाउंट, पीएफ अकाउंट यांसह अन्य अनेक ठिकाणी दिलेला बँक खाते क्रमांक अपडेट करणं गरजेचं आहे.

  First published: