Home /News /money /

OLA ची कमान आता 'नारीच्या शक्ती'च्या हाती; चालवणार जगातील सर्वात मोठा E-Scooter Plant

OLA ची कमान आता 'नारीच्या शक्ती'च्या हाती; चालवणार जगातील सर्वात मोठा E-Scooter Plant

Ola च्या नव्या इ स्कूटरचा कारखाना चालवण्याची धुरा महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

    दिल्ली, 14 सप्टेंबर : भारतातील मोठी प्रवासी वाहतूक कंपनी ओला (OLA) ने एक मत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील ऑटो मार्केट (Auto Market) मध्ये ई-स्‍कूटर (Ola E-scooter) उतरवल्यानंतर आता तामिळनाडूस्थित कंपनीच्या ई-स्‍कूटरच्या प्लान्टची (OLA E-Scooter Plant In Tamilnadu) धूरा महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी घेतला आहे. त्यामुळे भारतातील एका मोठ्या कंपनीचे नेतृत्व महिलांच्या हाती आले आहे. यासंदर्भात भाविश अग्रवाल यांनी आपल्या वैयक्तीक ट्विटर (Twitter) अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. आत्मनिर्भर भारत (Aatmanirbhar Bharat) योजनेच्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता हा संपूर्णपणे 10 हजार महिलांद्वारा (All Women Plant) संचालित होणारा जगातील पहिला प्लान्ट असेल असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. प्रत्येक वाहनासाठी आता महिला जबाबदार भाविश अग्रवाल यांनी महिलांच्या पहिल्या बॅचसोबत फोटो शेयर करत आता याठिकाणी तयार होणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी महिला या जबाबदारीने काम करतील, असं म्हटलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. Customer Careच्या नावाखाली असा होतो Online Fraud,हे अ‍ॅप चुकूनही डाउनलोड करू नका महिलांद्वारे GDP ला लागणार हातभार भाविश अग्रवाल यांनी एका रिपोर्टचा संदर्भ देत महिलांच्या या सहभागामुळे देशाच्या GDP मध्ये 27 टक्क्यांचा हातभार लागेल, भारताला जगातील मॅन्युफैक्चरिंग हब बनवण्यासाठी आम्ही महिलांचा सहभाग घेत आहोत, असं म्हटलं आहे. दरवर्षी होणार 1 कोटी ई-स्‍कूटरचे निर्माण ओला कंपनीने आपल्या तामिळनाडूतील या प्लान्टवर 2400 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं, त्यामुळे आता कंपनी वार्षिक 10 लाख ओलाच्या ई-स्‍कूटरचे निर्माण करण्याच्या हेतूने या प्रकल्पात गूंतवणूक आणि महिलांना स्थान देणार आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Scooter ride, Stock Markets, Tamilnadu

    पुढील बातम्या