Home /News /money /

WazirX नंतर क्रिप्टोकरन्सीच्या आणखी एका कंपनीवर टॅक्सचोरी प्रकरणी DGGI ची छापेमारी : रिपोर्ट

WazirX नंतर क्रिप्टोकरन्सीच्या आणखी एका कंपनीवर टॅक्सचोरी प्रकरणी DGGI ची छापेमारी : रिपोर्ट

DGGI अधिकार्‍यांनी शुक्रवारी सांगितले की विभागाने कर चुकवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज WazirX वर 49.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    मुंबई, 1 जानेवारी : गूड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजेन्स डायरेक्टोरेटने (Directorate General of Goods and Services Tax Intelligence- DGGI) क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्सवर (WazirX) छापा टाकल्यानंतर देशभरातील प्रमुख क्रिप्टोकरन्सी सर्व्हिस प्रोव्हायडरच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यांचे नेतृत्व जीएसटी इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी केले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, डीजीजीआयला मोठ्या प्रमाणावर करचोरी आढळून आली आहे. यापूर्वी, DGGI अधिकार्‍यांनी शुक्रवारी सांगितले की विभागाने कर चुकवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज WazirX वर 49.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरमहा होईल लाखोंची कमाई! नवीन वर्षात सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून मिळेल मदत GST मुंबई (पूर्व आयुक्तालय क्षेत्र) ने क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्सच्या व्यावसायिक हालचालींची चौकशी करताना 40.5 कोटी रुपयांची जीएसटी चोरी शोधली आहे. निवेदनात, एजन्सीने म्हटले आहे की त्यांनी फर्मकडून 49.20 कोटी रुपये रोख वसूल केले आहेत ज्यात व्याज आणि दंड समाविष्ट आहे. निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा, जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवली क्रिप्टोकरन्सी काय आहे? क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे जे एनक्रिप्शनद्वारे सुरक्षित केले जाते. डिसेंट्रलाईज्ड टेक्नोलॉजी, ब्लॉकचेनद्वारे क्रिप्टोकरन्सीची देखभाल केली जाते. यामध्ये केलेले पेमेंट काही वॉलेटच्या स्वरूपात इंटरनेट वापरून केले जाते. हे चलन दिसत नाही, म्हणून ही कॅशलेस पेमेंटची सर्वात प्रगत आवृत्ती आहे, जी डिजिटल स्वरूपात होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cryptocurrency, Money

    पुढील बातम्या