मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Nykaa च्या शेअरमध्ये Q2 निकालानंतर मोठी पडझड; आता खरेदीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

Nykaa च्या शेअरमध्ये Q2 निकालानंतर मोठी पडझड; आता खरेदीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

Nykaa कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात 95 टक्क्यांनी घट झाली आहे. या कालावधीत कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 27 कोटी रुपये होता या तुलनेत या तिमाहीत नफा 1.2 कोटी आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 15 नोव्हेंबर : Nykaa चे शेअर्स आज इंट्राडेमध्ये बीएसईवर 3 टक्क्यांहून अधिक घसरून 2,285 वर आले. नुकत्याच लिस्टिंग (Nykaa share Price) झालेल्या या कंपनीने रविवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल (Nykaa Q2 Result) सादर केले आहेत. FSN E-Commerce Ventures ही Nykaa ची मूळ कंपनी, जी ऑनलाइन सौंदर्य उत्पादने विकते.

Nykaa कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात 95 टक्क्यांनी घट झाली आहे. या कालावधीत कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 27 कोटी रुपये होता या तुलनेत या तिमाहीत नफा 1.2 कोटी आहे. या कालावधीत कंपनीचं उत्पन्न 47 टक्क्यांनी वाढलं आहे. कंपनीचं उत्पन्न 885.3 कोटी रुपये असून गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 603.8 कोटी होते.

कंपनीचे GMV (Gross Merchandise Value) वार्षिक आधारावर 38 टक्क्यांनी वाढून 1186 कोटी झाले आहे, तर फॅशन GMV वार्षिक आधारावर 215 टक्क्यांनी वाढून 437 कोटी झाली आहे.

वर्षभरात 'हा' शेअर 16 टक्के वाढणार, MOTILAL OSWAL चा अंदाज; तुमच्याकडे आहे का?

GCL सिक्युरिटीजचे रवी सिंघल म्हणतात की कंपनीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत मोठी घट झाली आहे, परंतु कंपनीच्या कमाईत वार्षिक आधारावर सुमारे 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. या शेअर्समध्ये 1900 आसपास खरेदी करुन गुंतवणूकदारांना 2 वर्षांसाठी 3600 रुपयांच्या टार्गेटसह खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी 1770 रुपये प्रति शेअर स्टॉप लॉस देण्यात आला आहे.

फक्त 53 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 35 लाख रुपये!

Nykaa चा प्रोडक्ट पोर्टफोलिओ खूप वैविध्यपूर्ण आहे. यामध्ये सौंदर्य, पर्सनल केअर आणि फॅशनशी संबंधित अनेक उत्पादनांचा समावेश आहे. Nykaa चा 3 दिवसीय IPO 28 ऑक्टोबर रोजी उघडला आणि शेवटच्या दिवशी, 1 नोव्हेंबरपर्यंत 81.78 पटीने सदस्यता घेतली गेली.

First published:

Tags: Investment, Money, Share market