मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Nykaa IPO मुळे गुतंवणूकदार मालामाल; जबरदस्त लिस्टिंगसह कंपनीची मार्केट कॅप 1 लाख कोटींच्या पार

Nykaa IPO मुळे गुतंवणूकदार मालामाल; जबरदस्त लिस्टिंगसह कंपनीची मार्केट कॅप 1 लाख कोटींच्या पार

NSE वरील Nykaa च्या शेअर्समधील ट्रेडिंग इश्यू प्राईजच्या 82 टक्के वर 2054 रुपयांवर झाली. तर बीएसईवर त्याचे शेअर्स 2063 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

NSE वरील Nykaa च्या शेअर्समधील ट्रेडिंग इश्यू प्राईजच्या 82 टक्के वर 2054 रुपयांवर झाली. तर बीएसईवर त्याचे शेअर्स 2063 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

NSE वरील Nykaa च्या शेअर्समधील ट्रेडिंग इश्यू प्राईजच्या 82 टक्के वर 2054 रुपयांवर झाली. तर बीएसईवर त्याचे शेअर्स 2063 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 10 नोव्हेंबर : Nykaa IPO मध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार (Investors) काही तासात मालामाल झाले आहेत. आज शेअर बाजारात Nykaa च्या शेअर्सची लिस्टिंग जोरदार झाली. कंपनीचे शेअर्स BSE वर 77.87 टक्के वाढून 876 रुपये वर 2001 रुपयांवर लिस्ट झाले. तर NSE वर Nykaa चे शेअर्स 79.38% नी वाढून 893 वर 2018 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 1125 रुपये आहे.

यासह, ब्यूटी स्टार्टअप Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर (Falguni Nayar) या भारतातील सर्वात श्रीमंत स्वयं-निर्मित महिला अब्जाधीश बनल्या आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, फाल्गुनी नायर, ज्यांच्याकडे Nykaa ची जवळपास निम्मी मालकी आहे, त्या आता सुमारे 6.5 अब्ज डॉलरच्या मालक बनल्या आहे. कंपनीचे शेअर 89 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स, Nykaa स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रवेश करणारी भारतातील पहिली महिला-नेतृत्व असलेली युनिकॉर्न कंपनी आहे.

'या' बँकेच्या ग्राहकांना झटका! 1 डिसेंबरपासून बचत खात्याबाबत होतोय बदल, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

NSE वरील Nykaa च्या शेअर्समधील ट्रेडिंग इश्यू प्राईजच्या 82 टक्के वर 2054 रुपयांवर झाली. तर बीएसईवर त्याचे शेअर्स 2063 रुपयांवर ट्रेड करत आहेत. यासह Nykaa चे मार्केट कॅप 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. कंपनीचा IPO 28 ऑक्टोबर रोजी ओपन आणि 1 नोव्हेंबर रोजी बंद झाला. कंपनीचा इश्यू 87.78 वेळा सबस्क्राइब झाला. कंपनीच्या 2.64 कोटी इक्विटी शेअर्ससाठी 216.59 कोटी इक्विटी शेअर्सचा लिलाव झाला.

एका महिन्यात होणार 25 लाख विवाह; 3 लाख कोटीहून अधिक उलाढालीची अपेक्षा- CAIT

कंपनीचा व्यवसाय कसा आहे?

Nykaa हे भारतातील सर्वात मोठे ब्यूटी आणि पर्सनल केअर ऑनलाईन मार्केटप्लेस आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये, कंपनीने 1.71 कोटी ऑर्डर डिलिव्हर केल्या. Nykaa चे देशभरातील 40 शहरांमध्ये जवळपास 80 ऑफलाईन स्टोअर्स आहेत. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 2441 कोटी रुपयांपर्यंत वाढला होता आणि कंपनीने 61.9 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मार्च अखेर कंपनीचे मोबाईल अॅप्स सुमारे 4.37 कोटी डाऊनलोड झाले होते. कंपनीच्या ऑनलाइन ग्रॉस मर्चेंडाऊज वॅल्यूमध्ये मोबाईल अॅप्सद्वारे केलेल्या खरेदीचा 86 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market