मुंबई, 8 नोव्हेंबर : Nykaa आणि Nykaa Fashion ची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures च्या शेअर्सचे वाटप (Nykaa IPO Share Allotment) आज होणार आहे. कंपनीचा इश्यू 28 ऑक्टोबरला ओपन झाला आणि 1 नोव्हेंबरला बंद झाला. हा IPO शेवटच्या दिवसापर्यंत 81.78 पटीने सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव हिस्सा 12.06 पट भरला. दुसरीकडे, NII चा वाटा 112.02 पट आणि QIB चा वाटा 91.18 पट होता. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिस्स्यावर 1.87 पट बोली लागली.
GMP वर काय चालले आहे?
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, Nykaa चे अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 650 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. कंपनीची इश्यू किंमत 1085-1125 रुपये आहे. यानुसार, Nykaa चे शेअर्स रु. 1775 (1125 + 650) वर ट्रेड करत आहेत.
शेअर्सचे वाटप आणि लिस्टिंग कधी होणार?
Nykaa शेअर्सचे वाटप आज होणार आहे. ज्यांना हे शेअर्स मिळणार नाहीत, त्यांचे पैसे 9 नोव्हेंबरला म्हणजे उद्या परत केले जातील. तर ज्यांना Nykaa चे शेअर्स मिळतील, त्यांचे शेअर्स त्यांच्या डिमॅट खात्यात 10 नोव्हेंबरपासून दिसू लागतील. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 11 नोव्हेंबर रोजी BSE-NSE वर आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान कमी होईल
शेअर स्टेटस कसं तपासणार?
>>सर्व प्रथम https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर क्लिक करा.
>> या लिंकवर क्लिक केल्यानंतर Status of Issue Application चे पेज उघडेल. त्यावर इक्विटी ऑप्शन निवडा.
>> ज्या कंपनीसाठी तुम्हाला IPO चे वाटप तपासायचे आहे त्या कंपनीचे नाव निवडा.
>>त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाका. याच्या खाली तुम्हाला तुमच्या पॅनचा तपशील द्यावा लागेल.
>> यानंतर, I am not a robot च्या बॉक्सवर क्लिक करून तुमची पडताळणी करा.
>> यानंतर सर्च बटण दाबा आणि स्टेटस तुमच्यासमोर येईल.
माजी इन्व्हेस्टमेंट बँकर फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये Nykaa ची सुरूवात केले. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत, Nykaa 5.58 कोटी वेळा डाउनलोड झाला आहे. 2021 च्या आर्थिक वर्षात Nykaa चा निव्वळ नफा 61.9 कोटी रुपये होता. या तुलनेत 2020 या आर्थिक वर्षात कंपनीला 16.3 कोटी रुपयांचा तोटा झाला. Nykaa ने 2014 मध्ये पहिलं स्टोअर लाँच केला. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कंपनीचे देशभरातील 40 शहरांमध्ये 80 स्टोअर्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market