बँक FDपेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे होतील दुप्पट

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करणं सुरक्षेच्या दृष्टीनं चांगलं आहे.

  • Share this:

प्रत्येकजण गुंतवणूक करताना त्यातून लवकर चांगला परतावा मिळावा यासाठी प्रयत्न करत असतात. गुंतवणुकीचे अनेक पर्याय शोधले जातात. अनेकजण बँकेत फिक्स डिपॉझिट (FD) करण्यावर भर देतात.

पोस्ट ऑफिसची एक अशी योजना आहे ज्यात बँकेतील FD पेक्षा कमी वेळेत पैसे दुप्पट होतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(NSC) असे योजनेचे नाव आहे.

भारत सरकारने सुरु केलेली या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही पोस्ट  ऑफिसमध्ये बचत करता येते. याची मुदत 5 वर्ष असते. यावर 8 टक्के वार्षिक व्याज मिळते. या बचतीवर 3 महिन्यांनी व्याज दिलं जातं.

या योजनेत दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 8 टक्के व्याजदराने 9 वर्षांत रक्कम दुप्पट होते. हेच पैसे बँकेत FD केल्यास तुमचे पैसे दुप्पट होण्यास साडे दहा वर्ष लागतील.

NSC मध्ये कोणीही प्रौढ व्यक्ती स्वत:च्या किंवा मुलांच्या नावावर सर्टिफिकेट खरेदी करता येतं. यामध्ये शंभर रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतची सर्टिफिकेट मिळतात. यात गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्याना आयकरात सूट मिळते. ही सूट फक्त दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास त्याच्या रकमेच्या सुरक्षेची हमी सरकार घेते. त्यामुळे पैसे बुडण्याची भीती ग्राहकाला राहत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 10:08 AM IST

ताज्या बातम्या