भारतीयांच्या जेवणाची चवच बदलली, तुमची पत्नी तर नाही ना या यादीत?

भारतीयांच्या जेवणाची चवच बदलली, तुमची पत्नी तर नाही ना या यादीत?

हल्ली घरातले सगळेच कामासाठी घराबाहेर पडतात. घरी स्वयंपाक करायला कोणाकडे वेळ नाही.

  • Share this:

मुंबई, 14 मे : देशात बदलत्या काळाप्रमाणे आर्थिक स्थितीतही बदल होतोय. हल्ली घरातले सगळेच कामासाठी घराबाहेर पडतात. घरी स्वयंपाक करायला कोणाकडे वेळ नाही. म्हणून लोक महिन्यातून सात दिवस बाहेर जेवतात. हातात पैसा खेळत असल्यानं ते महिन्यात 2500 रुपये जेवणावर खर्च करतात. 7 वेळा रेस्टाॅरंटमध्ये जातात.

नथुराम गोडसेबाबतचं वक्तव्य, कमल हसन यांना जीवे मारण्याची धमकी

नॅशनल रेस्टाॅरंट असोसिएशन आॅफ इंडियानं केलेल्या सर्वेमध्ये हे वास्तव समोर आलंय. त्यात लोकांची बदलती आहारशैली समोर आलीय. त्यात असं आढळून आलंय की 3 टक्के भारतीय रोज घराबाहेर जेवतात. तर 44 टक्के महिन्यातून दोन किंवा तीन वेळा जेवायला घराबाहेर जातात. 27 टक्के लोक दर आठवड्याला घराबाहेर हाॅटेलमध्ये खाणं पसंत करतात. यात 37 टक्के महिला आणि 63 टक्के पुरुष आहेत.

मुंबईत वर्ल्ड टेंड सेंटरच्या 30व्या मजल्यावरून आत्महत्या

लोक घराबाहेर जेवण्याऐवजी घरी खाणं पसंत करतात

बाजारात स्विगी आणि झोमॅटोसारख्याा खाद्यपदार्थ पोचवणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे हाॅटेलचे पदार्थ खाण्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही. झोमॅटोचा दावा आहे की, त्यांना दर महिन्याला 2 कोटी 10 लाख रुपयांची आॅर्डर मिळते. तर स्विगीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना दर महिन्याला 2 कोटींची आॅर्डर मिळते. प्रत्येक आॅर्डर जवळजवळ 300 रुपयांची असते.

भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचे युनिफॉर्म बदलणार; मागवल्या सूचना!

90 टक्के लोक खाण्याच्या बिलाचे पैसे देतात

सर्वेमध्ये हेही समोर आलंय की 90 टक्के लोक डिलिव्हरी बाॅयला पैसेच देतात. तर 10 टक्के मिल वाऊचर. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, मोबाइल वाॅलेट यांनी पैसे देतात. 11 टक्के घरी आॅर्डर करतात तर 14 टक्के लोक स्वत:च हाॅटेलमध्ये जाऊन पार्सल आणतात. सर्वेमध्ये 130 रेस्टाॅरंटचे सीईओ आणि 3500 ग्राहकांबरोबर बातचीत केली गेली.

सर्वेमध्ये हेही समोर आलंय की, पती-पत्नी एकत्र असतील 86 टक्के पत्नी आॅर्डर करते. सगळं कुटुंब सोबत असेल तर 78 टक्के आॅर्डर मुलंच करतात. दिवसांप्रमाणे बाहेर खाण्याचा मूड बदलतो. सोमवारी तो 9 टक्के असतो, तर रविवारी 42 टक्के असतं.

VIDEO: सिंधुदुर्गातील दोन गावांमध्ये 6 हत्तींचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीती

First published: May 14, 2019, 11:13 AM IST
Tags: foodZomato

ताज्या बातम्या