मुंबई: शासकीय नोकरीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनातर्फे निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन दिली जात असे. आता या नियमांमध्ये बदल करून अलीकडच्या काळात नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारण्यात आली आहे. त्यामुळे सध्या नोकरीत असलेले कर्मचारी निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये, यासाठी आपापल्या परीनं गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेकजण वेगवेगळ्या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करतात. यासोबतच अनेक प्रकारच्या पेन्शन स्कीमदेखील उपलब्ध आहेत. ज्यापैकी राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) सर्वाधिक लोकप्रिय पर्याय मानला जातो.
एनपीएस ही आपत्कालीन निधीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर एनपीएस खातेदारानं वारस नेमला, तर खातेदाराच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीला खात्यातून पैसे काढता येतात. मात्र, त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे एनपीएसबाबत सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे. ‘झी बिझनेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इन्शुरन्स खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांना मिळणार इन्सेंटिव्ह, 2023 च्या बजेटकडून 'या' आहेत अपेक्षा
एनपीएस योजनेमध्ये खातेदाराला निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. या योजनेत नियुक्ती करणारा आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात. या शिवाय, सेवानिवृत्तीपूर्वी खातेदाराला आपत्कालीन निधीची आवश्यकता असल्यास, या ठेवीतून 60 टक्के रक्कम काढता येते. पण, 40 टक्के रक्कम पेन्शनमध्ये टाकणं आवश्यक आहे.
एनपीएसचे नियम
एनपीएसशी संबंधित काही नियमांमध्ये बदल झाले आहेत. पूर्वी एनपीएसमध्ये गुंतवणुकीची कमाल वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत होती. आता यामध्ये गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा 18 ते 70 वर्षे आहे. 65-70 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक, ओसीआयमध्ये गुंतवणूक करू शकतात. पेन्शन फंडात प्रवेश करण्याची वयोमर्यादा 70 वर्षे आहे. याशिवाय, एनपीएसमधून पैसे काढण्याचे नियमही सोपे झाले आहेत.
आता पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम एकदाच काढणं सोपं झालं आहे. यामध्ये 40 टक्के रकमेतून अॅन्युइटी घेणं बंधनकारक आहे. 65 वर्षांनंतर इक्विटीमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाटप शक्य होईल आणि तीन वर्षांपूर्वी पैसे काढल्यास प्री-मॅच्युअर एक्झिट मानली जाईल. प्री-मॅच्युअर विड्रॉवलमध्ये, 80 टक्के अॅन्युइटी घेणं आवश्यक आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम काढणं शक्य आहे.
PPF मध्ये जास्त व्याजदर मिळवण्यासाठी सिक्रेट हॅक, तुम्हाला माहिती आहे का?
एनपीएसमधून कसे पैसे काढता येतात
एनपीएसमधील पैसे काढण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तीन वर्षांनंतर अंशत: पैसे काढता येतात. 10 वर्षांनंतर गुंतवणूक थांबवली जाऊ शकते आणि वयाच्या 60 व्या वर्षीदेखील पैसे काढणं शक्य आहे.
एनपीएसमधून पैसे काढण्याचे नियम
- अंशत: पैसे काढण्याचे नियम
एनपीएसमध्ये किमान तीन वर्षे गुंतवणूक पाहिजे.
सदस्यांच्या एकूण योगदानातून 25 टक्के पैसे काढता येतात.
सदस्यता कालावधी दरम्यान एकूण तीन वेळा पैसे काढणं शक्य आहे.
काही महत्त्वाच्या कारणांमुळे अंशत: पैसे काढणं शक्य आहे.
- या कारणांसाठी काढता येतात अंशत: पैसे
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी
मुलांच्या लग्नासाठी
घर खरेदी आणि नूतनीकरणासाठी
गंभीर आजारांच्या उपचारांसाठी
- एनपीएसमधून पूर्ण बाहेर पडण्याचे नियम
सदस्याचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असावं.
अशा परिस्थितीत, कॉर्पसमधील 20 टक्के पैसे काढणं शक्य.
उर्वरित रक्कम अॅन्युइटीमध्ये गुंतवली जाईल.
कॉर्पस 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास तुम्ही संपूर्ण कॉर्पस काढू शकता.
खाते बंद केल्यास पुन्हा उघडता येणार नाही.
- निवृत्तीनंतर एनपीएसमधून पैसे काढण्याचे नियम
सेवानिवृत्तीनंतर 60 टक्के रक्कम काढणं शक्य.
60 टक्के पैसे काढल्यास ते करमुक्त असतील बाकीची रक्कम अॅन्युइटीमध्ये जाईल.
जर कॉर्पस दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर संपूर्ण पैसे एकदाचं काढणं शक्य आहे.
- नॉमिनीला पैसे मिळण्याबाबत नियम
खातेदाराचा वयाच्या 60 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास, नॉमिनीला रक्कम मिळेल
सरकारी कर्मचाऱ्यांनी एकूण रकमेपैकी 80 टक्के अॅन्युइटी प्लॅन घेणं आवश्यक.
सरकारी कर्मचाऱ्याच्या नॉमिनीला उर्वरित रकमेचे एकवेळ पेमेंट
जर रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर सर्व पैसे काढणं शक्य.
बिगर सरकारी कर्मचाऱ्याच्या नॉमिनीला सर्व रक्कम मिळेल.
- नॉमिनी नसल्यास एनपीएसमधून पैसे काढण्यासाठी दावा कसा करायचा?
नॉमिनेशनपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, रक्कम कायदेशीर वारसाला मिळेल.
रकमेच्या दाव्यासाठी वारस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
हे प्रमाणपत्र राज्याच्या महसूल विभागाकडे सादर केलं जाईल.
पडताळणीनंतर खातेधारकाची जमा रक्कम कुटुंबाला दिली जाईल.
- एनपीएस डेथ क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रं
खातेदाराचं मृत्यू प्रमाणपत्र
खातेदाराचं आधार कार्ड
नॉमिनी/वारस यांचं आधार कार्ड
वारस प्रमाणपत्र
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pension, Pension funds, Pension scheme