मुंबई, 28 ऑक्टोबर : शरीरात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आपण करु शकतो. मात्र शरीराने साथ सोडली तर आपण परावलंबी होतो. त्यातही आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम (Financially Independent ) असू तर जगणं सोपं होतं. त्यामुळेच निवृत्तीनंतर (After Retirement) बहुतेक सर्वांना त्यांच्या मासिक खर्चाची चिंता असते. प्रत्येकाला कोणत्याही आर्थिक अडथळ्याशिवाय तणावमुक्त वृद्धापकाळात जगायचे असते. त्यासाठी पगाराप्रमाणेच ते नियमित उत्पन्नाचे साधन राहिले पाहिजे. यासाठी नोकरीच्या काळातच सेवानिवृत्तीचे नियोजन सुरू करणे आवश्यक आहे. जेणेकरून निवृत्तीच्या वेळी मोठा निधी निर्माण होऊन नियमित पेन्शन मिळू शकेल. यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टिम (National Prnsion System) हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊयात.
वयाच्या 21 व्या वर्षी गुंतवणूक सुरु केली तर
जर गुंतवणूकदाराचे सरासरी वय 21 वर्षे असेल आणि त्याने मासिक 4500 रुपये गुंतवले तर तो 21 ते 60 वर्षे वयापर्यंत 39 वर्षे गुंतवणूक करेल. म्हणजेच, तो वार्षिक 54000 रुपयांची गुंतवणूक करेल आणि 39 वर्षांत, 21.06 लाख रुपये या योजनेत गुंतवले जातील. जर 10 टक्के रिटर्न असेल, तर मॅच्युरिटीवर ती रक्कम 2.59 कोटी रुपये होईल. म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 51,848 रुपये पेन्शन मिळेल. एका अंदाजानुसार ही आकडेवारी करण्यात आली आहे.
निवृत्तीनंतर 1.56 कोटी रुपये मिळतील
NPS मध्ये, जर तुम्ही 40 टक्के अॅन्युटी (Annuity)घेतली आणि त्याचा वार्षिक दर 6 टक्के असेल, तर निवृत्तीनंतर तुम्हाला 1.56 कोटी रुपये मिळतील. त्यानंतर 1.04 कोटी अॅन्युटीमध्ये जातील. आता या वार्षिक रकमेतून तुम्हाला दरमहा 51,548 रुपये पेन्शन मिळेल. अॅन्युइटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी तुमची पेन्शन जास्त असेल.
तुम्ही NPS ऑनलाइन उघडू शकता
>> eNPS ओपन करण्यासाठी Enps.nsdl.com/eNPS किंवा Nps.karvy.com या लिंकवर क्लिक करा.
>> New Registraion वर क्लिक करा आणि तुमचा तपशील आणि मोबाईल नंबर भरा. तुमचा मोबाइल नंबर ओटीपीद्वारे वेरिफाय केला जाईल. त्यानंतर बँक खात्याचे तपशील भरा.
>> तुमचा Portfolio आणि Fund निवडा.
>> नामनिर्देशित व्यक्तीचे नाव भरा.
>> ज्या खात्यासाठी तुम्ही तपशील भरला आहे त्याचा कॅन्सल चेक तुम्हाला द्यावा लागेल. तुम्हाला कॅन्सल चेक, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
>> तुमची गुंतवणूक NPS मध्ये करावी लागेल.
>> पेमेंट केल्यानंतर, तुमचा Permanant Retire Account Number तयार केला जाईल. तुम्हाला पेमेंटची पावती देखील मिळेल.
>> गुंतवणूक केल्यानंतर, 'e-sign/print registration form' पेजवर जा. येथे तुम्ही पॅन आणि नेटबँकिंगमध्ये नोंदणी करू शकता. इथे तुमची केवायसी होईल. नोंदणी करताना, हे लक्षात ठेवा की ते तुमच्या बँक खात्यात दिलेल्या डिटेलशी लिंक झाले पाहिजे. सध्या 22 बँका NPS ऑनलाईन घेण्याची सुविधा देत आहेत. त्यांची माहिती NSDL च्या वेबसाईटवर मिळेल.
रेशन दुकानांत मिळणार LPG Gas Cylinder? वाचा काय आहे सरकारचा प्लॅन
NPS वर कर सूट उपलब्ध
सध्या, आयकराच्या कलम 80 CCD (1), 80 CCD (1B) आणि 80 CCD (2) अंतर्गत NPS वर कर सूट उपलब्ध आहे. NPS वर 1.50 लाख रुपयांव्यतिरिक्त आणखी 50,000 रुपयांची सूट घेऊ शकता. म्हणजेच NPS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही 2 लाख रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance, Investment, Money