Home /News /money /

कोरोनाच्या काळातही ही सरकारी गुंतवणूक योजना देतेय 12 टक्के रिटर्न, जाणून घ्या अधिक

कोरोनाच्या काळातही ही सरकारी गुंतवणूक योजना देतेय 12 टक्के रिटर्न, जाणून घ्या अधिक

तुम्ही पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या योजनेबाबत एकदा वाचाच.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर :गेल्या एका वर्षात सरासरी 12 टक्के रिटर्न देणारी नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही अनेक गुंतवणुकदारांची आवडती गुंतवणूक योजना ठरली आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही योजना 2004 साली फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठी आणली गेली होती. ही योजना त्या आधीच्या जुन्या पेन्शन योजना बंद करून सुरू केली होती. पुढे 5 वर्षांनी 2009 मध्ये ही योजना सर्व नागरिकांसाठी खुली करण्यात आली. गेल्या एका आर्थिक वर्षात ह्या योजनेत डबल डिजिट रिटर्न मिळाले आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना एक उत्तम पर्याय ठरली आहे. जिथे एकीकडे NPS च्या डेट स्कीम्सने गेल्या एका वर्षात डबल डिजिट रिटर्न्सचा आकडा दाखवला तिथं दुसरीकडे इतर फिक्सड इन्कम गुंतवणूक पर्यायांमध्ये काही खास रिटर्न येताना दिसले नाहीत. एक वर्षात NPS च्या स्कीम G ने सरासरी 12 टक्के रिटर्न दिले आहेत. NPS ची स्कीम G सरकारी बॉन्ड्स आणि इतर सिक्युरिटीज (Government Bonds and Securities) मध्ये गुंतवणूक करते. हा कमी जोखीम असलेला गुंतवणूक पर्याय मानला जातो. ह्याच कारणामुळे अनेक अनुभवहीन गुंतवणूकदारसुद्धा चांगल्या परताव्यासाठी विचार न करता ह्या योजनेत गुंतवणूक करतात. वाचा-घरगुती सिलिंडर धारकांसाठी मोठी बातमी, 1 नोव्हेंबरपासून बदलणार नियम जरी ही योजना आकर्षक वाटत असली तरीही भविष्यात जवळपास अशाच परताव्याची अपेक्षा करण्यापूर्वी NPSची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. NPS चं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा एक लो-कोस्ट स्ट्रक्चरवाला गुंतवणूक पर्याय आहे. ह्याच सोबत टॅक्स सूट असल्यामुळे रिटायरमेंट प्लानिंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. वाचा-दसरा-दिवाळीआधी SBIचं ग्राहकांना गिफ्ट! सोनं खरेदी करताना आकरणार नाही 'हा' शुल्क NPS योजनेत इतके चांगले रिटर्न कसे मिळाले? बाँड यील्ड आणि बाँड किंमत यांच्यांत अप्रत्यक्ष संबंध आहे. यील्ड कमी होत असताना, डेट योजनांची किंमत वाढत जाते. जास्त व्याजदरामुळे या सिक्युरिटीज अधिक अनुकूल ठरतात. म्हणजे डेट योजनेची नेट असेट व्हॅल्यू म्हणजेच एनएव्ही वाढते. जर बाँड यील्ड वाढलं तर एनएव्ही कमी होईल. ह्याच कारणामुळे NPS चे रिटर्न दर इतके वाढले आहेत. हे आहेत बेस्ट परफॉर्मर गेल्या एका वर्षात एचडीएफसी पेन्शन मॅनेजमेंट फंड (HDFC Pension Management Fund) 13.43 टक्के रिटर्न देऊन बेस्ट परफॉर्मर ठरला आहे. त्याच्या मागोमाग एलआयसी पेन्शन फंडानी (LIC Pension Fund) 12.49 टक्के रिटर्न दिला आहे. ह्यांच्याच अगदी मागे आहे ICICI Pru Pension Fund Management ज्यांनी 12.25 टक्के रिटर्न दिला आहे. 10 वर्षांत G सिक्युरिटी उत्पन्न 6.70 टक्क्यांवरून घसरून 5.94 टक्क्यांवर आलं आहे. वाचा-25000 पगार असणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकार देणार 19 प्रकारच्या सुविधा या पुढेही इतकेच रिटर्न मिळतील का? NPS एक प्रकारचं मार्केट लिंक्ड प्रॉडक्ट आहे. ह्या योजनेत सुद्धा रिटर्नच्या दरांत चढ-उतार होतात. या गोष्टीची पूर्ण शक्यता आहे की येत्या काळात हे दर वाढतील, किंवा कमी सुद्धा होतील. जाणकार असं म्हणतात की फक्त रिटर्न पाहून ह्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ नये. इतर दीर्घकालीन गुंतावणुकीसारखं ह्यामध्ये गुंतवणूक करताना हा एक सल्ला दिला जातो की गुंतावणुकदाराने आपल्या वार्षिक आर्थिक उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करावं आणि काही काळासाठी येणाऱ्या चढ-उतारांवर लक्ष न देता दीर्घकालीन गुंतवणूक करावी. NPSमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, जसं की इक्विटी, कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज आणि ऑप्शन इन्व्हेस्टमेंट फंड्स. गुंतवणूकदाराला सर्वात आधी प्रॉडक्ट समजून घेणं आवश्यक आहे. केवळ रिटर्नसाठी या योजनेत गुंतवणूक करणं योग्य नाही. गुंतवणूकदाराने निवृत्तीसाठी बचत म्हणून दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या