नवी दिल्ली, 01 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून असा मीडिया अहवालात असा दावा केला जात होता की, 1 जानेवारीपासून युनिफाईड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface- UPI) च्या माध्यमातून पेमेंट करणे महागात पडू शकते. याकरता युजर्सना अतिरिक्त चार्ज द्यावं लागेल, जर एखादा व्यक्ती कोणतंही Third Party App वापरत असेल. यामुळे UPI Transaction वापरणाऱ्या युजर्समध्ये चिंतेचं वातावरण होतं.
दरम्यान ही बातमी चुकीची असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर कडून चालवण्यात येणाऱ्या एक्स्ट्रा चार्जेस लावण्याचा निर्णय घेतला आहे, हा दावा चुकीचा आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India, NPCI) शुक्रवारी 1 जानेवारी 2021 ने UPI पेमेंटबाबतची ही बातमी फेटाळली आहे. तुम्ही देखील या बातमीवर विश्वास ठेवू नका.
Hi, please be apprised that the above news is false. There is no connection to pricing or charges on UPI transactions in the press release for 30% capping for the volume of transactions which was released by NPCI on 5th November 2020. https://t.co/a2PrFui2ih
— UPI (@UPI_NPCI) January 1, 2021
एनपीसीआयने असे ट्वीट केले की यूपीआय व्यवहारावर अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले नाही आहे. तसेच, थर्ड पार्टी अॅप्सद्वारे केलेल्या पेमेंटवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले नाही आहे. त्याचबरोबर एनपीसीआयने म्हटले आहे की फी वाढविण्यासाठी सोशल मीडियावर प्रसारित होणार्या सर्व बातम्या सर्व बनावट आहेत. त्याशिवाय एनपीसीआयने सर्व ग्राहकांना अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि सतत आणि सोयीस्कर यूपीआय व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.