• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • वीज बिल भरण्यासाठी NPCI Bharat Billpay चा खास उपक्रम, कसा फायदा होईल?

वीज बिल भरण्यासाठी NPCI Bharat Billpay चा खास उपक्रम, कसा फायदा होईल?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची पूर्ण मालकीची उपकंपनी NPCI Bharat Billpay ने प्लॅटफॉर्मवर टाटा पॉवरच्या एकत्रीकरणाची घोषणा केली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : एनसीपीआय (NPCI) भारत बिल पेने (Bharat Bill Pay) टाटा पॉवरला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जोडले आहे. यामुळे कंपनीच्या ग्राहकांना कोणत्याही त्रासाशिवाय त्यांचे वीज बिल सहज भरता येणार आहे. मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात माहिती देण्यात आली आहे. यामुळे टाटा पॉवरचे (मुंबई) सात लाखांहून अधिक ग्राहक क्लिकपे पेमेंट लिंकद्वारे सहज वीज बिल भरू शकतील. ग्राहकांना दिलासा मिळेल नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची पूर्ण मालकीची उपकंपनी NPCI Bharat Billpay ने प्लॅटफॉर्मवर टाटा पॉवरच्या एकत्रीकरणाची घोषणा केली. टाटा पॉवर ही नुकत्याच सुरू झालेल्या प्लॅटफॉर्ममध्ये सामील होणारी पहिली वीज कंपनी आहे. याद्वारे कंपनीचे ग्राहक कोणत्याही त्रासाशिवाय आरामात वीज बिल भरू शकतील, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. Virtual real estate plot sell: आभासी जमिनीसाठी थोडेथोडके नव्हे तर खर्च केले 1 अब्ज! आतापर्यंतचं महागडं डील NPCI भरत बिलपेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नुपूर चतुर्वेदी म्हणाल्या की, आम्हाला खात्री आहे की या भागीदारीमुळे वीज बिल भरण्याच्या बाबतीत टाटा पॉवरच्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांना फायदा होईल. काय आहे पेट्रोल-डिझेलचा लेटेस्ट दर? काही दिवसात भाव उतरण्याची शक्यता विजेच्या खाजगीकरणाबाबत चिंता कृषी विभागाचे तीन कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर आता वीज विभाग आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या मनस्थितीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर आता वीज दुरुस्ती बिलाच्या संदर्भात हालचाली तीव्र होऊ शकतात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्याच्या शक्यतेविरोधातील आंदोलनाची रूपरेषा ठरत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनासोबतच शेतकऱ्यांचेही आंदोलन आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: