आता तुम्हाला खोटी नोट देऊन कुणी फसवू शकणार नाही, RBI आणतेय 'ही' सुविधा

आता तुम्हाला खोटी नोट देऊन कुणी फसवू शकणार नाही, RBI आणतेय 'ही' सुविधा

खोट्या नोटा अनेकदा चलनात येत असतात. आपल्या हातात आलेली नोट खरी आहे की खोटी हे ओळखणं खरंच कठीण असतं.

  • Share this:

मुंबई, 08 मे : खोट्या नोटा अनेकदा चलनात येत असतात. आपल्या हातात आलेली नोट खरी आहे की खोटी हे ओळखणं खरंच कठीण असतं. यासाठीच सरकार लवकरच एक डिजिटल अ‍ॅप आणतंय. त्यावर काम सुरू झालंय. अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच सरकार मोबाइल फोनवर खोट्या नोटा कशा ओळखायच्या यासाठी एक अ‍ॅप बनवतेय. ही जबाबदारी RBI वर सोपवलीय.

5 हजार रुपये गुंतवून कमवा 49 लाख, 'अशी' करा सुरुवात

अ‍ॅप बनवणाऱ्या एजन्सींची निवड प्रक्रिया सुरू

मीडिया रिपोर्टनुसार अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, खोट्या नोटा ओळखायचं अ‍ॅप बनवण्यासाठी एजन्सींची निवड केली जातेय. एकदा का एजन्सी नक्की झाली की  तयार होण्याची माहिती मिळेल. एकदा का अ‍ॅप तयार झालं की कुणीही व्यक्ती नोट खोटी असेल तर ओळखू शकेल.

पदवी नसेल तरी मिळेल या बड्या ई कॉमर्स कंपनीत नोकरी

हे अ‍ॅप अंध व्यक्तींसाठी उपयोगी

भारतीय रिझर्व्ह बँक खोटी नोट ओळखणं अंध व्यक्तींनाही सोपं जाईल असं अ‍ॅप बनवतंय. हे अ‍ॅप अंध व्यक्तींना नोट कुठली आहे हे सांगेल आणि ती खरी की खोटी हेही सांगेल.  शिवाय ही नोट भारतीय आहे की नाही हेही कळेल.

रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ

कॅमेऱ्याच्या मदतीनं नोट खरी आहे की खोटी हे कळेल

हे अ‍ॅप नोट कॅमेऱ्याच्या समोर ठेवली की तिची किंमत सांगेल. शिवाय यात अशी सिस्टिम असेल की अंध आणि कर्णबधीर असलेल्यांना ही नोट कुठली आहे ते कळेल.

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

First published: May 8, 2019, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading