मराठी बातम्या /बातम्या /मनी /

काय सांगता! ATM Card शिवायही काढता येतात पैसे, मार्ग आहे खूपच सोपा

काय सांगता! ATM Card शिवायही काढता येतात पैसे, मार्ग आहे खूपच सोपा

काय सांगता! ATM Card शिवायही काढता येतात पैसे, मार्ग आहे खूपच सोपा

काय सांगता! ATM Card शिवायही काढता येतात पैसे, मार्ग आहे खूपच सोपा

Cardless Cash Withdrawal: सेंट्रल रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँका, एटीएम नेटवर्क, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना एटीएममध्ये कार्ड-लेस कॅश काढण्याची सुविधा देण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून या सुविधेच्या मदतीने ग्राहक कोणत्याही एटीएममध्ये न जाता पैसे काढू शकतील.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 18 सप्टेंबर: आता तुम्ही एटीएम कार्डशिवायही एटीएममधून सहज पैसे काढू शकाल. कारण काही बँकांच्या एटीएममध्ये कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा दिली जात आहे. सध्या UPI  किंवा ऑनलाईन व्यवहारांचं प्रमाण भलेही वाढलं असलं तरी या युगातही रोखीनं व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. युनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या आगमनापासून लोक लहान आणि मोठ्या व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंटवर अवलंबून आहेत आणि त्यामुळं रोखीचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला असेल, परंतु तरीही मोठी लोकसंख्या रोखीनं व्यवहार करते. बऱ्याचदा अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला रोख रकमेची कधी गरज भासू शकते हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता, पण तुम्ही तुमचं एटीएम कार्ड आणायला विसरलात तर?  अशा परिस्थितीत तुम्ही आता कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता.

जर तुम्ही आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला एटीएमच्या स्क्रीनवर हा पर्याय नक्कीच दिसला असेल. तुमच्याकडे असा पर्याय आहे की तुम्ही कार्डशिवायही पैसे काढू शकता. कारण या वर्षी मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँका, एटीएम नेटवर्क, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएममध्ये आयसीसीडब्ल्यू किंवा इंटरऑपरेबल कार्ड-लेस कॅश विथड्रॉलची सुविधा देण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून या सुविधेच्या मदतीनं ग्राहक कोणत्याही एटीएम मधून डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय पैसे काढू शकतात.

तुम्ही जर ICICI बँकेचे ग्राहक असाल, तर त्यासाठी तुम्हाला iMobile अ‍ॅपवर लॉग इन करावं लागेल आणि कार्डलेस रोख पैसे काढण्याचा व्यवहार सुरू करावा लागेल. देशभरातील या बँकेच्या एटीएममधून तुम्ही कार्डशिवाय 15,000 रुपये सहज काढू शकता.

हेही वाचा: Education Loan: खूपच कमी व्याजानं शैक्षणिक कर्ज देतात 'या' बँका; शिक्षणात येणार नाही अडथळा

कार्डलेस कॅश काढण्याची प्रक्रिया (Cardless Cash Withdrawal at ICICI Bank ATM Process)-

सर्वप्रथम प्लेस्टोअरवरून तुमच्या स्मार्टफोनवर iMobile अॅप डाउनलोड करा. यानंतर iMobile अ‍ॅप ओपन केल्यानंतर सर्व्हिसेसमध्ये जा आणि कार्डलेस कॅश विथड्रॉल पर्यायावर क्लिक करा. - तुम्हाला काढायची असलेली रोख रक्कम आणि 4 अंकी तात्पुरता पिन एंटर करा आणि ज्यामधून पैसे काढायचे आहेत तो खाते क्रमांक निवडा. यानंतर स्क्रीनवर दर्शविलेल्या तपशीलांची पुष्टी करा आणि सबमिट वर क्लिक करा. व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक यशस्वी संदेश दिसेल.

आता तुम्हाला बँकेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर 6 अंकी कोड मिळेल, जो पुढील 6 तासांसाठी वैध असेल. या 6 तासांच्या आत तुम्हाला एटीएममधून पैसे काढावे लागतील. ICICI बँकेच्या ATM वर जा आणि विनंती केलेले तपशील प्रविष्ट करा - नोंदणीकृत मोबाइल नंबर, तुम्ही सेट केलेला तात्पुरता पिन नंबर, 6 अंकी कोड आणि किती पैसे काढायचे आहेत हा योग्य तपशील प्रविष्ट केल्यावर, एटीएममधून तुम्हाला पैसे काढता येतील. तुम्हाला संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढावी लागेल, हे लक्षात ठेवा.

जर तुम्हाला ICICI बँक शोधायची असेल, तर तुम्ही यासाठी 9222208888 या क्रमांकावर “ATMCC PINCODE” एसएमएस पाठवू शकता. या माध्यमातून तुम्हाला जवळचं ATM शोधणं सोपं होईल.

First published:

Tags: ATM, Money