तुमचं ATM कार्ड असं करता येत स्विच ऑन/ऑफ; फसवणूक टाळण्यासाठी वाचा स्मार्ट टिप्स!

तुम्ही तुमचे ATM कार्ड हवे तेव्हा स्विच ऑफ किंवा स्विच ऑन करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 06:12 PM IST

तुमचं ATM कार्ड असं करता येत स्विच ऑन/ऑफ; फसवणूक टाळण्यासाठी वाचा स्मार्ट टिप्स!

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: ATMचा वापर करून अनेक प्रकारचे आर्थिक गैरप्रकार केले जातात. ATM क्लोन असे की अन्य कोणत्याना कोणत्या मार्गाने फसवणूक केली जाते. फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचत असता. त्यामुळे ATMचा वापर करताना काळजी घ्या असा सल्ला दिला जातो. पण आज आम्ही तुम्हाला ATM कार्ड सर्वात सुरक्षित ठेवण्याचा एक स्मार्ट मार्ग सांगणार आहोत. यामुळे तुमचे ATM कार्ड हे सुरक्षित तर राहिलच आणि कोणी तुमची फसवणूक देखील करणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक आणि अॅक्सिस बँकसह अन्य अनेक बँकांनी ग्राहकांना ATM कार्ड स्विच ऑफ करण्याची सुविधा दिली आहे. होय तुम्ही अगदी बरोबर वाचला आहात. तुमचे ATM कार्ड स्विच ऑफ करता येत. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचे ATM कार्ड हवे तेव्हा स्विच ऑफ किंवा स्विच ऑन करू शकता. जाणून घ्या ATM सुरक्षित ठेवण्याचा स्मार्ट पर्याय...

जर तुम्ही SBI ग्राहक असाल तर

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर बँकेचे SBI Quick या अॅपच्या मदतीने डेबिट कार्ड स्विच ऑफ किंवा ऑन करू शकता. हे अॅप android आणि ios या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही अगदी सहजपणे डेबिट कार्ड स्विच ऑफ अथवा ऑन करू सकता. यासाठी खालील टप्पे फॉलो करा...

- सर्वात पहिला तुम्ही SBI Quick अॅप करा

Loading...

- अॅप डाऊनलोड केल्यानंतर ATM कार्ड कॉन्फिगरेशन करा

- ATM कार्ड कॉन्फिगरेशन या पर्यायावर क्लिक केल्यात तुम्हाला ATM कार्ड ब्लॉकिंग, ATM कार्ड स्विच ऑफ/ऑन आणि जनरेट पिन हे 3 अॅपशन मिळतील

- त्यातील ATM कार्ड स्विच ऑफ / स्विच ऑन या पर्यायावर क्लिक करा. तेथे तुम्ही कार्डवरील अखेरचे चार नंबर टाका

- त्यानतंर तुम्हाला चॅनल्स आणि युजेज हा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही ATM कार्डला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल वापरासाठी डिसेबल करू शकता. याशिवाय ATMच्या ई-कॉमर्स आणि POS वापराबाबतचा पर्याय निवडू शकता.

- तर तुम्हाला अॅप डाऊनलोड करायचे नसेल तर SMSच्या माध्यमातून देखील ATM कार्ड स्विचऑफ अथवा ऑन करू शकता. यासाठी तुम्हाला एक SMS पाठवावा लागेल.

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी...

जर तुम्ही ICICI बँकेचे ATM कार्ड वापरत असाल तर या बँकेच्या iMobile अॅपच्या मदतीने ATM कार्ड स्विच ऑन अथवा ऑफ करू शकता. हे अॅप android आणि ios या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. यासाठी खालील टप्पे फॉलो करा...

- सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरमधून iMobile अॅप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर अॅपमधील Manage कार्ड या पर्यायावर क्लिक करा.

- Manage कार्डमध्ये तुम्हाला पैसे काढणे, सर्व व्यवहार आणि इंटरनॅशनल व्यवहार हे पर्याय दिसतील. या अॅपच्या मदतीने तुम्ही कार्ड तातपुत्या काळासाठी ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला Temp Blockया पर्यायावर क्लिक करावा लागेल.

अॅक्सिस बँकेचे ATM असे स्विच ऑफ /ऑन करा

अॅक्सिस बँकेने देखील ग्राहकांना ATM कार्ड स्विच ऑफ आणि ऑन करण्याची सुविधा दिली आहे. यासाठी तुम्हाला बँकेचे अधिकृत अॅप डाऊनलोड करावे लागले. अॅप डाऊनलोड केल्यानंतर Serices & Support या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यातील डेबिट कार्ड स्विच ऑफ/ऑन यावर क्लिक करा आणि तुमच्या गरजेनुसार ATM सुरक्षितपणे वापरला. याशिवाय कॅनरा बँकेने देखील ग्राहकांना अशी सुविधा दिली आहे. त्यासाठी तुम्हाला Canara MServe अॅप डाऊनलोड करावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...