Home /News /money /

शबरीमाला 'स्वामी प्रसादम'साठी केरळ गाठण्याची गरज नाही, अशाप्रकारे घरपोच मिळवा प्रसाद

शबरीमाला 'स्वामी प्रसादम'साठी केरळ गाठण्याची गरज नाही, अशाप्रकारे घरपोच मिळवा प्रसाद

केरळमधील प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या शबरीमला मंदिरातील (Sabarimala Temple) ‘स्वामी प्रसादम’ खाण्यासाठी तुम्हाला केरळपर्यंत (Kerala) जाण्याची गरज नाही. तुमच्या घरीच तुम्हाला हा प्रसाद मिळू शकतो.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर: केरळमधील प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या शबरीमला मंदिरातील (Sabarimala Temple) ‘स्वामी प्रसादम’ खाण्यासाठी तुम्हाला केरळपर्यंत  (Kerala) जाण्याची गरज नाही. तुमच्या घरीच तुम्हाला हा प्रसाद मिळू शकतो. यासाठी गरज आहे ती फक्त भारतीय पोस्ट खात्याच्या (Indian Post Department) वेबसाईटवर जाऊन ऑर्डर देण्याची. फक्त एकच अट आहे ती म्हणजे एकावेळी फक्त एकच पाकीट मागवता येणार आहे. आतापर्यंत या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून नऊ हजारापेक्षा जास्त ऑर्डर्स नोंदवण्यात आल्या आहेत. याआधी डाक विभागाने देशातील अन्य भागातील देवस्थांनासाठीही पोस्ट खात्याच्या माध्यमातून घरपोच प्रसाद सेवा सुरू केली आहे. प्रसादाच्या एका पाकिटात असतील या सहा गोष्टी केरळ पोस्टल सर्कलनं (Kerala Post Circle) स्वामी प्रसादम (Swami Prasadam) घरोघरी पोहोचवण्याची सेवा सुरू केली आहे. प्रसादाच्या एका पाकिटासाठी 450 रुपये भरावे लागणार आहेत. या प्रसादाच्या पाकिटात अरावना, तूप, अंगारा (विभूती), हळद, कुंकू आणि अर्चना प्रसादम असतो. यासाठी स्पीड पोस्ट सेवेच्या माध्यामातून नोंदणी करता येते. स्पीड पोस्टच्या एका क्रमांकासह एक मेसेज भाविकांना मिळतो. पोस्ट खात्याच्या वेबसाईटवर लॉग इन करून भाविक प्रसादम पाकिटाची डिलिव्हरी कधी मिळणार याची माहिती घेऊ शकतात. 6 नोव्हेंबरपासून सुरू झाली ही सेवा पोस्ट खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सहा नोव्हेंबरपासून पोस्ट खात्यानं देशभरात शबरीमला मंदिराचा प्रसाद भाविकांना घरपोच देण्याची सेवा सुरू केली. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत नऊ हजार ऑर्डर्स नोंदवण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस ऑर्डर्सची संख्या वाढत आहे. (हे वाचा-Gold Price Today: सोनंचांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी!) या वर्षीच्या मंडलम यात्रेसाठी 16 नोव्हेंबरपासून शबरीमला मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे; मात्र कोरोनाच्या (Corornavirus) साथीमुळे अगदी मर्यादित संख्येत भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ‘कोविड 19’साठी सुरक्षिततेच्या अनेक कठोर नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे. (हे वाचा-स्वस्तात खरेदी करा IRCTC Share, पहिल्या दिवशी मिळालं दुप्पट सब्सक्रिप्शन) सध्या कोरोनामुळे भक्तांच्या मंदिरात जाण्यावरही निर्बंध आहेत. त्यामुळे देवस्थानांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भाविकांसाठी घरबसल्या देवदर्शन, आरती या सेवा ऑनलाइन उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर आता भारतीय पोस्ट खात्याच्या सहकार्यानं प्रसादही घरपोच मिळण्याची सोयही  उपलब्ध केली आहे. पोस्ट खात्याच्या मदतीने माता वैष्णोदेवी मंदिरानंही  (Mata Vaishno Devi) भाविकांना घरपोच प्रसाद पाठविण्याची सुविधा सुरू केली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Post office

    पुढील बातम्या