मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गोल्डन चान्स! SBI दर महिन्याला देणार तब्बल 60 हजार कमावण्याची संधी; जमा करावे लागतील 'हे' डॉक्युमेंट्स

गोल्डन चान्स! SBI दर महिन्याला देणार तब्बल 60 हजार कमावण्याची संधी; जमा करावे लागतील 'हे' डॉक्युमेंट्स

स्टेट बॅंक ऑफ इंडियाची एटीएम फ्रॅंचायझी (ATM Franchise) घेऊन तुम्ही हे उत्पन्न मिळवू शकता.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाची एटीएम फ्रॅंचायझी (ATM Franchise) घेऊन तुम्ही हे उत्पन्न मिळवू शकता.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाची एटीएम फ्रॅंचायझी (ATM Franchise) घेऊन तुम्ही हे उत्पन्न मिळवू शकता.

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : तुम्ही जर घरबसल्या नवा उद्योग-व्यवसाय (Business) सुरू करण्याचं नियोजन करत असाल किंवा अधिक उत्पन्नाचा स्रोत शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक उद्योग संकल्पना सुचवत आहोत. या माध्यमातून तुम्ही दरमहा 60 हजार रूपये घरबसल्या कमवू शकता. अर्थात ही संधी तुम्ही एसबीआयकडून (SBI) उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाची एटीएम फ्रॅंचायझी (ATM Franchise) घेऊन तुम्ही हे उत्पन्न मिळवू शकता.

कोणतीही बॅंक आपले एटीएम इन्स्टॉल करत नाही. हे काम अन्य कंपन्या करत असतात. बॅंकांकडून अन्य कंपन्यांना एटीएम इन्स्टॉल करण्यासाठी कंत्राट दिलं जातं. त्यानंतर यानंतर ठरलेल्या जागी एटीएम इन्स्टॉल करतात. एटीएम फ्रॅंचायझीच्या माध्यमातून तुम्ही कशी कमाई करु शकता जाणून घेऊया...

एसबीआय एटीएम फ्रॅंचायझी मिळवण्यासाठी आवश्यक अटी – शर्ती

- याकरिता तुमच्याकडं 50 ते 80 चौरस फूट जागा हवी.

- दुसऱ्या एटीएम पासून नियोजित एटीएमचं अंतर 100 मीटर असावं.

- ही जागा तळमजल्यावर आणि लगेच दृष्टिक्षेपात येणारी असावी.

- या ठिकाणी 24 तास वीज आणि 1KWचा बल्ब उपलब्ध असावा.

- या एटीएएममध्ये दररोज सुमारे 300 ट्रान्झॅक्शनची क्षमता असावी.

- एटीएमच्या जागेला कॉंक्रिटचं छत असावं.

- व्हि-सॅट लावण्यासाठी संबंधिक सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं असावं.

ही कागदपत्रं आवश्यक

- आयडी प्रुफ (ID -Proof) – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड.

- अॅड्रेस प्रुफ (Address Proof) – रेशन कार्ड, वीज बिल. - बॅंक अकाउंट आणि पासबुक.

- फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर.

- अन्य कागदपत्रं

- जीएसटी नंबर

- आर्थिक कागदपत्रं

एटीएम फ्रॅंचायजीसाठी असा करा अर्ज

एसबीआय एटीएएमची फ्रॅंचायजी काही कंपन्यांकडून दिली जाते. या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावून तुम्ही याकरिता अर्ज करू शकता. एटीएएम इन्स्टॉल (Install) करणाऱ्या कंपन्या वेगळ्या असतात, हे प्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतात प्रामुख्याने एटीएएम इन्स्टॉल करण्याचं कंत्राट टाटा इंडीकॅश (Tata Indicash), मुथुट एटीएम आणि इंडिया वन एटीएम (India One ATM) यांच्याकडं आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करत तुम्ही याकरिता अर्ज दाखल करू शकता.

या आहेत अधिकृत वेबसाईट

- TATA Indicash– www.indicash.co.in

- Muthoot ATM – www. muthootatm.com/suggest-atm.html

- India One ATM – india1atm.in/rent-your-space

गुंतवणूक किती करावी लागेल?

टाटा इंडीकॅश ही यामधील सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. ही कंपनी 2 लाख सिक्युरिटी डिपॉझिटवर फ्रॅंचायझी देते. हे डिपॉझिट रिफंडेबल असतं. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल स्वरुपात जमा करावे लागतील. अशा पध्दतीनं या फ्रॅंचायझीसाठी एकूण गुंतवणूक 5 लाख रूपयांची असते.

किती उत्पन्न मिळू शकेल?

उत्पन्नाविषयी बोलायचं झालं तर प्रत्येक कॅश ट्रान्झॅक्शनवर (Cash Transaction) 8 रुपये तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शनवर 2 रूपये मिळतात. गुंतवणूकीवरील परतावा वार्षिक आधारावर 33 ते 50 टक्क्यांपर्यंत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या एटीएएममधून दररोज 250 ट्रान्झॅक्शन झाल्या, आणि त्यात 65 टक्के कॅश आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रान्झॅक्शन असतील तर तुमचं महिन्याचं उत्पन्न सुमारे 45 हजार रुपयांपर्यंत असेल. तसेच दररोज 500 ट्रान्झॅक्शन झाल्या तर तुमचं कमिशन 88 ते 90 हजार रूपये असेल.

First published:

Tags: ATM, SBI