रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये कसं जेवण तयार होतं आता पाहता येणार LIVE

रेल्वेमध्ये तयार होण्याऱ्या जेवणावर आणि स्वच्छतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उठवलं जातं. त्यामुळे रेल्वेच्या पँट्रीपर्यंत किंवा किचनपर्यंत न जाता तुमच्या हातात असणाऱ्या मोबाइलवर ही सर्व प्रक्रिया पाहता येईल.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 05:49 PM IST

रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये कसं जेवण तयार होतं आता पाहता येणार LIVE

मुंबई, 6 जुलै : रेल्वेमधून प्रवास करताना चिंतेची बाब असते ती जेवणाची. प्रवास लांबचा असल्यास रेल्वेच्या कॅन्टीनमधून खाण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकांना त्या खाण्याविषयी, स्वच्छतेविषयी शंका असते. आणि त्यासंबंधीत तक्रारी IRCTC कडे वारंवार नोंदवल्या जातात. मात्र यावर भारतीय रेल्वेने तोडगा काढला आहे. आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये जेवण बनताना पाहू शकता आणि ते ही लाईव्ह. त्यामुळे अन्नाचा दर्जा, स्वच्छता यावर तुम्ही नजर ठेऊ शकता. कामातील पारदर्शकता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वेने हा उपक्रम चालू केला आहे. त्यामुळे प्रवासी आईआरसीटीसीच्या किचनमध्ये कशाप्रकारे खाणं तयार होतं हे अगदी लाईव्ह पाहू शकतात. रेल्वेमध्ये तयार होण्याऱ्या जेवणावर आणि स्वच्छतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उठवलं जातं. त्यामुळे किचनपर्यंत न जाता तुमच्या हातात असणाऱ्या मोबाइलवर ही सर्व प्रक्रिया पाहता येईल. सध्या ही सुविधा मर्यादित रेल्वे सेवांसाठी उपलब्ध आहे. लवकरच ती भारतातील सगळ्या रेल्वेमध्ये चालू करण्यात येईल. ही सर्व्हिस ऑनलाईन पाहण्यासाठी काय प्रक्रिया आहे ते जाणून घ्या.

SPECIAL REPORT : घटस्फोटाचं कारण ठरतोय मोबाईल

  1. सर्वात आधी खाली दिलेल्या साइटवर जा. https://www.irctc.co.in/nget/train-search
  2. त्या साइटच्या होम पेजवर 'गॅलरी' असा विभाग असेल तो निवडा.
  3. Loading...

  4. गॅलरी चा विभाग निवडल्यावर तुमच्यासमोर नवीन पेज उघडलं जाईल. पुढच्या पायरीमध्ये तुम्हाला व्हिडीओ चा पर्याय निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर 'Click Here For Live Streaming of IRCTC Kitchens - Pilot' असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  5. क्लिक केल्यावर तुमच्या समोर व्हिडीओ पॅनल येईल. त्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हिडीओ दिसतील. त्यापैकी तुम्ही असलेल्या रेल्वेला किंवा तुमच्या जवळील क्षेत्राला निवडून लाईव्ह प्रक्रिया पाहता येईल

एअर इंडियात केबिन क्रूसाठी व्हेकन्सी, 'अशी' होईल निवड

अशा प्रकारची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन भारतीय रेल्वे जेवणाच्या संदर्भातील तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रयत्नांमधून प्रवाशांना स्वच्छ आणि उत्तम खाणं मिळेल हीच आशा आहे.

Union Budget 2019: बजेट सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...