67 लाख पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनाकाळात घरबसल्याच जमा करा जीवन प्रमाणपत्र

67 लाख पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनाकाळात घरबसल्याच जमा करा जीवन प्रमाणपत्र

कोरोनाचे संक्रमण (Coronavirus) पाहता पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) घरबसल्या जमा करणेच हिताचे ठरणार आहे. जाणून घ्या याकरता कोणते पर्याय उपलब्ध आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: तुम्ही जर पेन्शनधारक (Pensioners) असाल आणि अद्याप तुमचे जीवन प्रमाणपत्र अर्थात Life Certificate जमा झालं नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोनाचे संकट (Coronavirus Pandemic) पाहता सरकारने जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी विविध पर्याय दिले आहेत, त्यापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून तुम्ही सहज जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता. तुमच्या जवळचे पोस्ट ऑफिस आणि बँकेत जाऊनही हे सर्टिफिकेट जमा करता येते.

कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS 95) अंतर्गत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात तुमचे जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असते. यावर्षी हे प्रमाणपत्र जमा करण्याची डेडलाइन 31 डिसेंबर 2020 आहे. लाइफ सर्टिफिकेट म्हणजे पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा असतो. हे जमा न केल्यास तुमचे पेन्शन थांबवले जाऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्याच हे सर्टिफिकेट जमा करता यावे याकरता ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे.

पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करा जीवन प्रमाणपत्र

EPFOची 135 क्षेत्रीय कार्यालयं आणि 117 जिल्हा कार्यालयांव्यतिरिक्त पेन्शनधारकांना हे सर्टिफिकेट  जवळची बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये देखील जमा करता येणार आहे, ज्याठिकाणी त्यांना पेन्शन प्राप्त होते.

(हे वाचा-विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मोदी सरकार पाठवत आहे 7 लाख रुपये? काय आहे सत्य)

CSC मध्ये जमा करा जीवन प्रमाणपत्र

सामान्य सेवा केंद्र (CSC) मध्ये देखील पेन्शनधारकांंना जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. याशिवाय पेन्शनधारक उमंग अ‍ॅप वापरून देखील हे प्रमाणपत्र जमा करू शकतात.

घरबसल्या होईल काम पूर्ण

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) जमा करण्याची सुविधा सुरू केली आहे. किरकोळ शुल्क देऊन तुम्ही घरबसल्याच लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी अर्ज करू शकता. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून एखादा पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी जाऊन डीएलसीची प्रक्रिया पूर्ण करेल.

वर्षभरात कधीही जमा करा DLC

ऑनलाइन माध्यमातून तुम्ही कधीही लाइफ सर्टिफिकेट अर्थात DLC जमा करू शकता. सर्टिफिकेट जमा केल्यानंतर वर्षभरासाठी हे जीवन प्रमाणपत्र वैध असते. ज्या पेन्शनधारकांचे 2020 या वर्षात पेंशन पेमेंट ऑर्डर (PPO) जारी झाले आहे, त्यांना वर्षभर जीवन प्रमाणपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. नोव्हेंबर महिन्यात ईपीएस पेन्शनधारकांची मोठी गर्दी होत असे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Umang App च्या माध्यमातून अशाप्रकारे जमा करा जीवन प्रमाणपत्र

-उमंग अ‍ॅपमध्ये Jeevan Pramaan service मध्ये जा. त्यानंतर तुमच्या फोनला बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट करा

(हे वाचा-या बँकेची खास योजना! महिलांना बचत खात्यावर मिळेल 7 टक्क्यांपर्यंत व्याज)

-जीवन प्रमाणपत्र सुविधेअंतर्गत देण्यात आलेल्या General Life Certificate टॅबवर क्लिक करा. याठिकाणी पेन्शन प्रमाणीकरण टॅबमध्ये तुमचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक दिसेल. दोन्ही बाबी बरोबर असतील तर जेनरेट ओटीपीवर क्लिक करा

-त्यानंतर याठिकाणी तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी सबमिट करा. त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइसच्या मदतीन फिंगरप्रिंट स्कॅन करा

-बोटांचे ठसे जुळल्यानंतर तुमचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार होईल. सर्टिफिकेट पाहण्यासाठी तुम्ही व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करू शकता. आधार क्रमांकाच्या साहाय्याने सर्टिफिकेट पाहता येईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 17, 2020, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading