मराठी बातम्या /बातम्या /मनी /

करोडपती होण्याची संधी! दररोज अवघे 95 रुपये करा जमा; अशा पद्धतीनं करा स्मार्ट गुंतवणूक

करोडपती होण्याची संधी! दररोज अवघे 95 रुपये करा जमा; अशा पद्धतीनं करा स्मार्ट गुंतवणूक

एक भन्नाट गुंतवणुकीची (How to Invest Money) आयडिया आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एक भन्नाट गुंतवणुकीची (How to Invest Money) आयडिया आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एक भन्नाट गुंतवणुकीची (How to Invest Money) आयडिया आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: आजकालच्या काळात फक्त पैसे कमवून काहीही अर्थ नाही तर गुंतवणूक (Smart Investment) करणं महत्त्वाचं आहे. सेवानिवृत्तीनंतर स्वतःसाठी काही पैसे जमा करून ठेवण्याच्या हेतूनं जर आतापासून थोडीथोडकी गुंतवणूक करून ठेवली तर तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. जर तुम्हीही करोडपती होण्याचं स्वप्न बघत असाल तर तुम्हाला कोणत्याही शोमध्ये प्रश्नाची उत्तर देण्याची गरज पडणार नाही. घरबसल्या तुम्हाला करोडपती होता येणार आहे. यासाठीची एक भन्नाट गुंतवणुकीची (How to Invest Money) आयडिया आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

जर तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर दररोज फक्त 95 रुपये जमा करण्याची गरज असणार आहे. अॅक्सिस बँकेच्या एसआयपी (Axis bank SIP Calculator) कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही दरमहा 2,861 रुपये गुंतवले तर 30 वर्षांनंतर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील. दररोज 95 रुपये आणि दरमहा 2861 रुपये हप्ता देऊन, तुम्ही तीन दशकांनंतर करोडपती व्हाल. यासाठी अंदाजे रिटर्न (Money returns) 12 टक्के निश्चित केला आहे. मात्र मार्केटनुसार  रिटर्नमध्ये बदल शक्य आहेत.

हे वाचा - Gold Price: सोने दरात वाढ, पाहा काय आहे मुंबईतील गोल्ड रेट

आजकालच्या काळात भरघोस पैसे कमवण्यासाठी अशा काही स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. मात्र अनेकांकडे एक रकमी पाऊस कारण्यासाठी इतके पैसे नसतात. म्हणूनच महिन्याच्या महिन्याला पैशांची गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. यासाठी SIP मध्ये गुंतवणूक करू शकता.

सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP यामध्ये तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर निश्चित रक्कम गुंतवू शकता. वेगवेगळ्या जीवन उद्दिष्टांसाठी नियोजन करून, तुम्ही गुंतवणूकीची रक्कम, गुंतवणुकीचा वर्ष कालावधी स्वतः ठरवू शकता.

First published:

Tags: Investment, Money, Savings and investments