• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • भन्नाट स्कीम! अवघ्या 28 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळवा 4 लाखांपर्यंतचा फायदा; वाचा कॅनरा बँकेची खास स्कीम

भन्नाट स्कीम! अवघ्या 28 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळवा 4 लाखांपर्यंतचा फायदा; वाचा कॅनरा बँकेची खास स्कीम

पाहूयात, काय आहे ही योजना, आणि कसा घेता येईल याचा लाभ.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : कॅनरा बँकेच्या (Canara Bank Schemes) कित्येक ग्राहकांना या बँकेतील विशेष योजनांबाबत माहिती नाही. आज आम्ही अशाच एका भन्नाट योजनेबाबत (Canara bank govt scheme) तुम्हाला सांगणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही दरमहा केवळ 28.5 रुपये जमा करून, तब्बल 4 लाखांपर्यंतचा फायदा (Canara bank scheme with benefits) मिळवू शकता. पाहूयात, काय आहे ही योजना, आणि कसा घेता येईल याचा लाभ. असा मिळवा चार लाखांपर्यंतचा फायदा चार लाख रुपयांपर्यंत फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अशा या दोन योजना आहेत. या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला अगदी कमी पैशांची गरज (Schemes with low investment) आहे. दोन्ही योजनांसाठी एकूण 342 रुपये जमा करावे लागणार आहेत. म्हणजेच, दरमहा केवळ 28.5 रुपये जमा करून तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता. जीवन ज्योती योजनेत दोन लाख रुपयांचा फायदा प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेसाठी (Jeevan Jyoti Beema Yojana) वार्षिक हप्ता हा 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला आयुर्विमा मिळतो. जर या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ईसीएसमार्फत घेतली जाते. हे वाचा- सोन्याच्या किंमतीत उसळी तर चांदीची झळाळी उतरली, तपासा आजचा लेटेस्ट भाव सुरक्षा विमा योजनेत अगदीच कमी हप्ता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Beema Yojana) ही केंद्र सरकारची आणखी एक विमा योजना आहे. यामध्ये अगदी कमी हप्त्यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळून जातो. याचा हप्ता हा केवळ १२ रुपये एवढा आहे. सरकारच्या आणखीही काही योजना केवळ या दोनच नाही, तर केंद्र सरकारच्या आणखीही काही योजना आहेत ज्या तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. तुमचे बँकेत जनधन (Jan Dhan Accidental cover) खातं असेल, तर तुम्हाला बँकेकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमाही मोफत मिळू शकतो. या व्यतिरिक्त, कमी गुंतवणुकीमध्ये जास्त परतावा मिळवून देणारी अटल पेन्शन योजनाही (Atal Pension Yojana) केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजने अंतर्गत दरमहा 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची खात्री केंद्र सरकार देत आहे. 40 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती या योजनेसाठी आपले नाव नोंदवू शकते. सरकारच्या या विविध योजनांचा लाभ तुम्ही कोणत्याही बँकेच्या माध्यमातन घेऊ शकता. कॅनरा बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती शेअर केली आहे.
  First published: