• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • आता घर बसल्या डिझेलची खरेदी; आता Diesel चीही Home Delivery

आता घर बसल्या डिझेलची खरेदी; आता Diesel चीही Home Delivery

या सुविधेच्या अंतर्गत बसून बसून जास्तीत जास्त 20 लीटर डिझेलची मागवू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्‍ली, 31 ऑक्टोबर : देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉरपोरेशन (IOC) ने दिल्‍लीतील स्‍टार्टअप हमसफर इंडियासोहत (Humsafar India) डिझेलची होम डिलीवरी (Diesel Home Delivery) सुरू केली आहे. या सुविधेच्या अंतर्गत बसून बसून जास्तीत जास्त 20 लीटर डिझेलची मागवू शकतात. आयओसीने मोबाइल अॅप फ्यूल हमसफर (Fuel Humsafar App) च्या माध्यमातून पंजाबमधील पतियाळा आणि मलेरकोटलामध्ये सफर-20 (Safar20) जेरी कॅनमध्ये डिझेलच्या डोअर स्‍टेप डिलीवरी सुरू केली आहे. होम डिलीवरीमधून काय आणि कोणाला होईल फायदा हमसफर इंडियाचे संस्‍थापक आणि निर्देशक सान्या गोयलने सांगितलं की, पहिल्यांदा ग्राहकांना बॅरलमध्ये खुदरा दुकानांमधून डिझेल खरेदी करावं लागत होतं. यामध्ये त्यांना फार त्रास होत होता. सोबतच डिझेलचं नुकसानदेखील होत होतं. तर फ्यूल हमसफर अॅप इंधनची सहज सोपी ऑर्डर आणि ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देतो. या नव्या सेनेत छोटे उद्योग, मॉल, रुग्णालय, बँका, शेतकरी, मोबाइल टॉवर, शिक्षण संस्थांसह छोट्या उद्योगांचा फायदा होईल. हे ही वाचा-Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरात वाढ कायम, तपासा तुमच्या शहरातील रेट कोठे सुरू झाली डोअर स्टेप डिलिव्हरी IOC ने सांगितलं की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, केरळ, गुजरात, गोवा, नोएडा, दिल्ली, फरीदाबाद आणि गाझियाबादसह संपूर्ण NCR मध्ये होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले की, ही सेवा अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना 20 लिटरपेक्षा कमी डिझेल हवे आहे. कसे असतील आयओसीच्या दुसऱ्या तिमाहीचे परिणाम आयओसीचं वित्त वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीचा शुद्ध लाभ वाढून 6,360.05 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीला एप्रिल-जून 2021 तिमाही मध्ये 5,941.37 कोटी रुपयांचा शुद्ध लाभ झाला होता. कंपनीने जुलै-सप्टेंबर 2021 तिमाही दरम्यान 1.9 कोटी टन तेल विकलं. गेल्या वित्त वर्षांच्या  समान तिमाहीमध्ये त्याची विक्री 1.77 कोटी टन होती. तिमाही दरम्यान कंपनीच्या रिफायनरियोंने 1.52 कोटी टन कच्च्या तेलाला इंधनमध्ये बदललं. गेले वित्त वर्षाच्या समान तिमाहीमध्ये हा आकडा 1.39 कोटी टन राहिलं होतं.

  Published by:Meenal Gangurde
  First published: