आता काही मिनिटातच तुमचे आवडते पदार्थ घरपोच, 'ही' कंपनी करणार फूड डिलिव्हरी

आता काही मिनिटातच तुमचे आवडते पदार्थ घरपोच, 'ही' कंपनी करणार फूड डिलिव्हरी

Zomato, Uber eats, Swiggy, Amazone - तुम्हाला बाहेरून खाद्यपदार्थ ऑर्डर करायची सवय असेल तर त्यात अजून एका मोठ्या कंपनीची भर पडलीय

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : तुम्हाला बाहेरून काही खाद्यपदार्थ ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही झोमॅटो, स्वीगी इथून मागवत असाल. तुमच्या लिस्टमध्ये अजून एक महत्त्वाचं नाव येणार आहे. ते आहे दिग्गज ई काॅमर्स कंपनी अमेझाॅनचं. ही कंपनी आता भारतात फूड डिलिव्हरी सर्विस लाँच करणार आहे. सध्या बाजारात असलेल्या झोमॅटो, अमेझाॅन, फूड पांडा आणि उबर इट्सला चांगलीच स्पर्धा सुरू होईल. येत्या दिवाळीपर्यंत अमेझाॅन आपली फूड डिलिव्हरी सर्विस लाँच करेल.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार अमेझाॅन भारतात आपली फूड डिलिव्हरी लाँच करण्यासाठी नारायण मूर्ती यांची कंपनी कॅटामारनसोबत काम करण्याची आखणी करतेय. कॅटामारननं यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू केलीय. याबद्दलची माहिती अजून सार्वजनिक केलेली नाही.

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

बिझनेस स्टँडर्डनं आपल्या बातमीत म्हटलंय की अमेझाॅन भारतात उबर इट्स खरेदी करण्याची योजना आखतेय. अमेझाॅननं उबरशी याबद्दल बोलणी केलीयत. पण दोन्ही कंपन्यांनी अजून हे मान्य केलेलं नाही.

जगातल्या टाॅप CEO मध्ये मुकेश अंबानी, 'या' 10 भारतीयांचाही समावेश

भारतात ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवेची बाजारपेठ गेल्या दोन वर्षात जोरदार सुरू आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रात दुप्पट वृद्धी पाहायला मिळाली होती. ती अजून तशीच आहे.

वेस्ट इंडिजमध्ये विराट मोडणार धोनीसह 'या' दिग्गज खेळाडूंचे मोठे रेकॉर्ड!

काही दिवसांपूर्वी अमेझाॅननं अमेरिकेत फूड डिलिव्हरी सुरू केली होती. पण वाढती स्पर्धा पाहता गेल्याच महिन्यात ही सेवा बंद केली. भारतीय बाजारपेठ अमेझाॅनसाठी फायदेशीर आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी मार्केट तेजीत आहे. म्हणूनच कंपनी भारतात ही सेवा करू पाहतेय.

काही दिवसांपूर्वी ई काॅमर्स कंपनी अमेझाॅननं क्लियरट्रिप ( ClearTrip )बरोबर ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलंय.आता अमेझाॅनच्या मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाइटच्या पेजवर विमानाचं बुकिंग करू शकता. या पोर्टलवर तिकीट रद्द करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

VIDEO: पुण्यात 'मुसळधार', भिडे पुल पाण्याखाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: amazon
First Published: Jul 30, 2019 01:13 PM IST

ताज्या बातम्या