Aadhaar च्या नव्या नियमाची अफवा, पत्ता बदलण्यासाठी नाही तर बँक खात्यासाठी घेतला हा निर्णय

Aadhaar च्या नव्या नियमाची अफवा, पत्ता बदलण्यासाठी नाही तर बँक खात्यासाठी घेतला हा निर्णय

आधार कार्डवरील पत्ता सहजपणे बदलता येईल अशा नियमाची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली होती. तसा काही नियम नसल्याचं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : आधार कार्डच्या केवायसी नियमांमध्ये बँक खातं उघडण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय इतर काही बदल केलेले नाहीत असं अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांत आधार कार्डचा पत्ता बदलण्यासाठी नियम सोपे करण्यात आल्याचं म्हटलं जात होत. त्यावर अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं. मनी लाँड्रिंगला आळा घालण्यासाठी कऱण्यात आलेल्या आदेशानंतर आधारच्या नियमावरून गोंधळ उडाला होता.

मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, आधारच्या केवायसीचा वापर अशा लोकांसाठी सोपा करण्यात आला आहे जे कामानिमित्त किंवा इतर काही कारणाने एका दुसऱ्या जागी स्थलांतर करतात. यामध्ये आधार कार्डवर घरचा पत्ता बदलण्यासाठीच्या प्रक्रियेत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत.

आधार कार्डवर घराचा पत्ता बदलण्यासाठी नाही तर फक्त बँकेत खातं उघडण्यासाठी आधार केवायसीसंबंधी नियम बदलला आहे. जर एखादी व्यक्ती कामानिमित्त त्याच्या घरापासून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा नव्या बँकेत खातं उघडताना किंवा बँकेची शाखा बदलण्यासह इतर गोष्टींसाठी केवायसीची गरज पडते. तेव्हा आधार कार्डवर घराचा पत्ता कायम ठेवत नव्या पत्त्याची माहिती स्वयंघोषणा पत्राद्वारे देता येते. यामुळे लोकांना खातं उघडणं सोपं जातं.

याआधी आधारमध्ये तुम्हाला तुमची माहिती अपडेट करता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बुधवारी समोर आलेल्या माहितीनुसार असं म्हटलं जात होतं की आधारचा पत्ता सहज बदलता येईल. मात्र अर्थ मंत्रालयानं अशा प्रकारचा नियम नसल्याचं सांगत निर्माण झालेला गोंधळ दूर केला. सध्या तुम्ही काही कारणाने आधार कार्डवर असलेल्या पत्त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी असाल तर स्वंयघोषणापत्राद्वारे दुसरा पत्ता देता येतो.

VIDEO : सेनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष्य, आशिष शेलारांचा टोला

Published by: Suraj Yadav
First published: November 15, 2019, 3:08 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading