मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Pulses Price Hike: महागाईपासून दिलास नाहीच; आता डाळींच्या किमतीत वाढ, काय आहे कारण?

Pulses Price Hike: महागाईपासून दिलास नाहीच; आता डाळींच्या किमतीत वाढ, काय आहे कारण?

Pulses  Price Hike: गेल्या 6 आठवड्यात तूर डाळ आणि उडीद डाळीच्या किमती 15 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. पाऊस आणि पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची चिंताही वाढली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 10 ऑगस्ट : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीने घर खर्चाचं बजेट कोलमडलंय. मात्र महागाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी आता डाळींच्या किमती वाढू लागल्या आहेत. डाळींचे भाव वाढल्याने जनतेच्या खिशात भर पडली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, उडीद आणि तूर यांच्या भावात अवघ्या 6 आठवड्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डाळी लोकांच्या रोजच्या जेवणातील भाग आहे. त्यामुळे डाळींच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम थेट स्वयंपाकघरातील खर्चावर होते. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या पेरणीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत तूर क्षेत्रात 4.6 टक्के घट झाली आहे, तर उडदाच्या क्षेत्रात 2 टक्के घट झाली आहे. India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही कृषी मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 6 आठवड्यात तूर डाळ आणि उडीद डाळीच्या किमती 15 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. पाऊस आणि पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची चिंताही वाढली आहे. महाराष्ट्रातील लातूरमध्ये दीड महिन्यापूर्वी 97 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या चांगल्या दर्जाच्या तूर डाळीचा एक्स मिल भाव आता 115 रुपये प्रतिकिलो झाला आहे, यावरून दरवाढीचा अंदाज लावता येतो. Credit Card खिशात घेऊन फिरता? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी नाहीतर… डाळी महागण्याचं कारण बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कडधान्यांचा साठा मर्यादित असणे आणि पावसाळ्यात कडधान्य पेरणीखालील क्षेत्र कमी होणे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरवठा आणखी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे किमती वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये आफ्रिकेतून 5,00,000 टन मालाची खेप अपेक्षित आहे. अतिवृष्टीमुळे उडीद पिकाचे अधिक नुकसान होऊ शकते. मात्र, आयातीच्या शक्यतेमुळे पुरवठ्याच्या दबावाला फारसा वाव नाही.
First published:

Tags: Central government, Inflation, Money

पुढील बातम्या