मराठी बातम्या /बातम्या /मनी /

हिवाळ्यात AC ची गरज नसताना रेल्वेचं तिकीट महागच विकलं जातं; तुम्हाला माहित आहे का कारण?

हिवाळ्यात AC ची गरज नसताना रेल्वेचं तिकीट महागच विकलं जातं; तुम्हाला माहित आहे का कारण?

ट्रेनमधील एसी कोचचे तिकीट खूप महाग असते हे तुम्हाला आधीच माहीत आहे. ते थर्ड, सेकंड आणि फर्स्ट एसीसाठी आणखी जास्त होते.

ट्रेनमधील एसी कोचचे तिकीट खूप महाग असते हे तुम्हाला आधीच माहीत आहे. ते थर्ड, सेकंड आणि फर्स्ट एसीसाठी आणखी जास्त होते.

ट्रेनमधील एसी कोचचे तिकीट खूप महाग असते हे तुम्हाला आधीच माहीत आहे. ते थर्ड, सेकंड आणि फर्स्ट एसीसाठी आणखी जास्त होते.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 7 ऑगस्ट : रेल्वे हा नेहमीच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. भारतीय रेल्वेतून दररोज करोडो लोक प्रवास करतात. मात्र रेल्वेचे असे अनेक नियम आहेत ज्याची अनेकांना माहिती नसते. जेव्हा लोक उन्हाळ्यात प्रवास करतात तेव्हा ते ट्रेनच्या एसी कोचमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देतात कारण त्या कोचमध्ये उष्णता जाणवत नाही. एसी डब्यातून प्रवास करणाऱ्यांनी कधी विचार केला आहे का की, हिवाळ्यात ट्रेनमध्ये एवढी गरज नसताना एसी कोचसाठी जास्त पैसे का घेतले जातात? उन्हाळ्याच्या हंगामात ट्रेनमध्ये एसी नेहमीच चालू असतो, यासाठी जास्त पैसे घेणे ठीक आहे. दुसरीकडे हिवाळ्यात असेच बंद राहतात त्यामुळे रेल्वेची वीजेची बचतही होत असेल, मग जास्त भाडे का आकारले जाते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागेही एक कारण आहे. राकेश झुनझनवाला यांची 'अकासा एअर' आजपासून सुरु; मुंबई-अहमदाबाद पहिलं उड्डाण एसी कोचचे भाडे जास्त का? ट्रेनमधील एसी कोचचे तिकीट खूप महाग असते हे तुम्हाला आधीच माहीत आहे. ते थर्ड, सेकंड आणि फर्स्ट एसीसाठीही जास्त होते. मात्र, एसी कोचमध्येही भरपूर सुविधा आणि स्वच्छता असते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कितीही गरम असले तरी अशा डब्यात गरम होत नाही. Online Shoppingवर होईल मोठी बचत, 'या' खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स हिवाळ्यातही एसी सुरु असतात का? उन्हाळ्यात बाहेरचे तापमान जास्त असते. यामुळे डब्यातील तापमान राखण्यासाठी एसी चालवले जातात. त्याचप्रमाणे हिवाळ्यातही बाहेरचे तापमान खूपच कमी होते, त्यामुळे डब्यातील तापमान मेंन्टेन करण्यासाठी हीटर चालवले जाते. म्हणजेच हिवाळा असो की उन्हाळा, अशी यंत्रणा कार्यरत राहते. फायदा काय? हिवाळ्यात एसीमध्ये बसवलेले हीटर ट्रेनमध्ये चालवले जातात आणि ब्लोअर चालवून संपूर्ण डब्यात गरम हवा पुरवली जाते. ट्रेनमध्ये बसवलेले हीटर हे विशेष प्रकारचे असते. यामुळे तुमची त्वचा कोरडी होत नाही. तर घरातील हीटरमुळे त्वचेतील ओलावा नाहीसा होतो.
First published:

Tags: Indian railway, Railway

पुढील बातम्या