मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता मिळणार नाही 2000 रुपयांची नोट; RBI ने घेतला मोठा निर्णय

आता मिळणार नाही 2000 रुपयांची नोट; RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI ने 2000 रुपयांच्या नोटांची (Rs. 2,000 currency notes) छपाई थांबवली आहे.

RBI ने 2000 रुपयांच्या नोटांची (Rs. 2,000 currency notes) छपाई थांबवली आहे.

RBI ने 2000 रुपयांच्या नोटांची (Rs. 2,000 currency notes) छपाई थांबवली आहे.

मुंबई, 28 मे : आता लवकरच तुमच्या खिशातील 2000 रुपयांची नोट (Rs. 2000 currency notes)  गायब होणार आहे. कारण या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve bank of india) 2000 रुपयांची नोट चलनातून हळूहळू मागे घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही या नोटांची छपाई होणार नाही आहे, अशी माहिती आरबीआयने  (RBI)  दिली आहे.

RBI ने गेल्या आर्थिक वर्षात 2000 रुपयांची नोट छापली नव्हती. 2021-2022 या आर्थिक वर्षातही ही नोट छापली जाणार नाही, असं आरबीआयने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. 26 मे 2021 रोजी हा रिपोर्ट जारी करण्यात आला होता.

आरबीआयच्या या रिपोर्टनुसार 2021 मध्ये कागदी नोटा 0.3 टक्के घटून 2,23,301 लाख युनिट आहेत. मूल्याचा विचार करता मार्च 2021 मध्ये 4.9 लाख कोटी रुपयांच्या 2000 नोटा चलनात होत्या.

हे वाचा - पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, आता काढता येणार संपूर्ण रक्कम?

तर मार्च 2020 मध्ये यांचं 5.48 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या.  मार्च 2018 ते 2000 के सिस्टममध्ये 336.3 कोटी नोटा होत्या. मार्च 31, 2021 मध्ये यांची संख्या घटून 245.1 कोटींवर आली आहे. याचा अर्थ तीन वर्षांत 91.2 कोटी नोटा चलन व्यवस्थेतून बाहेर करण्यात आल्या आहेत.

काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने 2016  साली नोटबंदी केली. त्याचवेळी अचानक 2000 हजार रुपयांच्या (Rs. 2000) नोटा चलनात आणल्या. पण जास्त मूल्याची नोट असल्याने अशा फेक नोटा बाजारात येण्याचा धोका जास्त असतो.

हे वाचा - हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला करेल लखपती; वाचा कशी करायची विक्री

2016 साली काळ्या पैसे आणि नकली नोटांना लगाम घालण्यासाठी सरकारने जुन्या 500 च्या नोटा बंद केल्या आणि 1000 रुपयांच्या नोटा पूर्णपणे हद्दपार केल्या. त्यानंतर 500 च्या नव्या नोटा चलनात आणल्या आणि एक हजार रुपयांच्या नोटांऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या. या नोटांसह 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणल्या.

First published:
top videos

    Tags: Money, Rbi, Rbi latest news