Home /News /money /

Petrol-Diesel : तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय इंधन?

Petrol-Diesel : तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय इंधन?

सरकारी रिफायनरी कंपन्यांना रशियाकडून स्वस्त तेल मिळत आहे. त्यामुळेच 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

    मुंबई, 3 जुलै : बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price) खूप चढ-उतार होत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी क्रूडची किंमत, जी प्रति बॅरल 115 डॉलरच्या वर होती, ती सध्या 111 डॉलरच्या जवळ आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने पुरवठा वाढवण्याचे संकेत दिले आहेत. मंदीच्या भीतीने इंधनाचा (Fuel) वापर कमी होणे अपेक्षित आहे. या कारणांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 111 डॉलरच्या आसपास घसरली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत आजही कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. सरकारी रिफायनरी कंपन्यांना रशियाकडून स्वस्त तेल मिळत आहे. त्यामुळेच 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. एका माशामुळे मच्छिमाराचं नशीब पालटलं; 3 तास चाललेल्या बोलीनंतर एवढा महाग विकला गेला एक मासा राज्यातील प्रमुख शहरांतील दर >> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर >> पुणे - पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर >> नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीटर >> नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. Business Idea : 8000 रूपये क्विंटल दर असलेल्या 'या' गव्हाची शेती करा आणि व्हा मालामाल! तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या