Home /News /money /

Petrol-Diesel Prices Today: 80 दिवस उलटूनही इंधन दराबाबत सामान्यांना दिलासा नाहीच; जाणून घ्या आजचे रेट

Petrol-Diesel Prices Today: 80 दिवस उलटूनही इंधन दराबाबत सामान्यांना दिलासा नाहीच; जाणून घ्या आजचे रेट

Petrol, Diesel prices today: इंधन दरात मागील वर्षी 4 नोव्हेंबर रोजी बदल झाले होते. त्यानंतर अद्यापही भाव स्थिर आहेत. भाव वाढत नसले, तरी आधीच गगनाला भिडलेल्या दरांमुळे पेट्रोल-डिझेल दरामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही.

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : आयओसीएलने (IOCL) आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी वाट पाहत आता 80 दिवस उलटले आहेत. आजही किमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. इंधन दरात मागील वर्षी 4 नोव्हेंबर रोजी बदल झाले होते. त्यानंतर अद्यापही भाव स्थिर आहेत. भाव वाढत नसले, तरी आधीच गगनाला भिडलेल्या दरांमुळे अद्यापही पेट्रोल-डिझेल दरामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे. नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये प्रति लीटर कपात केली होती. त्यामुळे इंधन दर काही प्रमाणात कमी झाला होता. परंतु तरीही जनतेला इंधनासाठी अद्यापही 100 हून अधिक रुपये लीटरसाठी द्यावे लागत आहेत.

    हे वाचा - Fixed Deposite का आहे सुरक्षित गुंतवणूक, आणखीही काय फायदे मिळतात? चेक डिटेल्स

    महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल दर (Today's Petrol and Diesel Prices in Maharashtra) -
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये

    हे वाचा - Health Insurance : रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही रिजेक्ट होऊ शकतो कोविड क्लेम

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol price

    पुढील बातम्या