छोट्या उद्योगांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, आता कर्ज मिळणं सोपं होणार

छोट्या उद्योगांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, आता कर्ज मिळणं सोपं होणार

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार ज्या अनेक उपायोजना करत आहे त्याचाच एक भाग म्हणूून आता छोट्या उद्योगांना मदत करण्याचा सरकारने निर्णय घेतलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 17 डिसेंबर : देशात अर्थव्यवस्थेला मंदीचं ग्रहण लागल्याने विकासाचा वेग मंदावलाय. सर्वच क्षेत्रात हीच स्थिती असल्याने अर्थव्यवस्थेसमोर संकट निर्माण झालंय. गुंतवणूक होत नसल्याने रोजगार निर्मितीही थंडावली आहे. तर खर्च कमी करण्यासाठी अनेक उद्योगांना रोजगार कपात करावी लागली. ही परिस्थिती रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योगंत्री नितीन गडकरी (Nitin Gadhkari)यांनी लघू आणि मध्यम उद्योगात (MSME) असलेल्या व्यावसायिकांसाठी आणखी एक घोषणा केलीय. या उद्योगांना स्वस्त दराने कर्ज मिळावं यासाठी नव्या योजनेची घोषणा केलीय. त्यामुळे अशा उद्योगांना कर्ज मिळण्यासाठी मदत होईल असंही गडकरी यांनी म्हटलंय.

गडकरी म्हणाले, MSME उद्योगांना सध्या ज्या दराने कर्ज दिलं जातं त्यात किमान दोन टक्क्यांची सुट दिली जाणार आहे. त्याचबरोबर एक कोटींचं Incremental लोन मिळण्यासाठीही मदत होणार आहे. त्याचबरोबर कर भरणं आणि इतर गोष्टींमध्येही अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांना उद्योग चालवणं आणि त्यासाठीची सर्व कामं सुटसुटीत होणार आहेत.

पॅन-आधारबाबत आयकर विभागाचं ठरलं! 31 डिसेंबरच्या आधी करा लिंक

सेवा कर आणि केंद्रीय अबकारी करबाबत जुन्या प्रलंबित वादग्रस्त खटल्यांच्या निराकरणासाठी सुरू केलेली सबका विश्वास योजनेची मुदत 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. नव्या वर्षात या योजनेचा लाभ घेता येणार नसल्यानं काहीसा नाराजीचा सूर आहे. सेवा कर आणि केंद्रीय अबकारी कराबाबत वाद सोडविण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चालू वर्षातील अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेला सबका विश्वास योजना 2019' असे नाव देण्यात होते.

वाचा-बँकेतील अर्थिक व्यवहारांसाठी आता आकारलं जाणार अतिरिक्त शुल्क

1 सप्टेंबरपासून ही योजना देशभरात लागू करण्यात आली होती. या योजनेची अंतिम मुदत 31 डिसेंबर असून त्याचा लाभ नव्या वर्षात घेता येणार नाही. या योजनेंतर्गत जुन्या वादग्रस्त प्रकरणात पात्र व्यक्तींना स्वतःची कर देण्याची रक्कम जाहीर करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 31 डिसेंबरआधी तुम्ही तो घेऊ शकता. याची संपूर्ण माहिती वेबासईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही ही माहिती वेबसाईटवरून घेऊ शकता. 1 लाख 83 हजार प्रकरणांमध्ये साधारण 3.60 लाख करोड रुपयांचा कर थकला आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चाललेल्या वादामुळे हा कर थकल्याची माहिती देण्यात आली. सेवा कर आणि केंद्रीय अबकारी करासंदर्भात त्वरित निराकरणासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने आपल्या मुख्य आयुक्तांना सबका विश्वास योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र करदात्यांसह सक्रीयपणे कार्य करण्यास सांगितले होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2019 03:43 PM IST

ताज्या बातम्या