मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचं बजेट सादर करणार आहेत. संसदेमध्ये सादर केलं जाणारं बजेट मोदी सरकारचं हे शेवटचं बजेट असणार आहे. त्यानंतर 2024 ला पुन्हा निवडणुका होणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ असतो.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ करण्याची ही फार जुनी परंपरा आहे. हलवा समारंभात अर्थ मंत्रालयात हलवा तयार केला जातो. अर्थ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हा हलवा वाटला जातो. बजेटच्या कामात गुंतण्यापूर्वी प्रत्येकाचे तोंड गोड असते.
यंदाच्या बजेटमध्ये Income Tax लिमिट वाढणार? नोकरदार वर्गाला ‘या’ आहेत अपेक्षा
हलवा समारंभाची परंपरा बरीच जुनी असून ती दरवर्षी केली जाते. मात्र कोविडमुळे 2022 मध्ये हा समारंभ करण्यात आला नव्हता. गेल्या वर्षी अर्थसंकल्प छापण्याआधी हलवा समारंभ झाला नव्हता. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात मिठाई देण्यात आली होती. दरवर्षी अर्थसंकल्पाची छपाई सुरू होण्यापूर्वी हलवा समारंभ होतो.
अत्यंत गोपनीय अर्थसंकल्पीय दस्तऐवज तयार करताना, त्यात सहभागी अधिकारी आणि कर्मचारी 10 दिवस त्यांच्या घरापासून तसेच संपूर्ण जगापासून दूर राहतात. अर्थसंकल्प तयार करत असताना अर्थमंत्र्यांच्या अत्यंत वरिष्ठ आणि विश्वासू अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी देण्यात येते.
Union Budget 2023 : 80C ची मुदत संपली तर अजून कोणत्या मार्गाने तुमचा कर वाचवू शकता? Video
बजेटमध्ये हलवा समारंभ आवश्यक आहे कारण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गोडाधोडाने होते. 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत अधिकाऱ्यांना मंत्रालयातच राहायचं आहे. ते त्याच्या कुटुंबीयांशी ही संपर्क साधू शकत नाही. त्यांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागते. १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.