मराठी बातम्या /बातम्या /मनी /सरकार कलम 80C आणि 80D कधी रद्द करणार? अर्थमंत्री म्हणाल्या...

सरकार कलम 80C आणि 80D कधी रद्द करणार? अर्थमंत्री म्हणाल्या...

80 सी आणि 80 डीवर अर्थमंत्र्यांचे भाष्य

80 सी आणि 80 डीवर अर्थमंत्र्यांचे भाष्य

अर्थमंत्र्यांनी नुकताच देशाचे बजेट सादर केले. दरम्यान शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ओल्ड टॅक्स स्लॅबविषयी महत्त्वाचे भाष्य केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

Nirmala Sitharaman Interview after Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये त्यांनी टॅक्सविषयी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता बजेट सादर केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी पहिल्यांदाच न्यूज 18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी नवीन टॅक्स स्लॅबविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. तसेच सरकार कलम 80 सी आणि 80 डी कधी रद्द करणार या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर दिले.

80C आणि 80D विषयी म्हणाल्या...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, मी सूट आणि कपात काढण्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वतःची पसंत स्वतः निवडावी.

Nirmala Sitharaman Interview after Budget 2023: मनरेगाच्या मजुरांनाही मिळणार PM आवास योजनेचा लाभ, सीतारामन यांची माहिती! 

नवीन टॅक्स स्लॅबविषयी अर्थमंत्री म्हणतात...

'नवीन कर व्यवस्था पालन आणि कर दरांसाठी आकर्षक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते. आपण किती टॅक्स भरतो हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. तसेच घरबसल्या टॅक्स रिटर्न फाइल करावा. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींनंतर, मला आशा आहे की किमान 50 टक्के करदाते नवीन आयकर प्रणालीमध्ये स्थलांतरित होतील आणि कमी दरांचा लाभ घेऊ शकतील.'

नवीन टॅक्स स्लॅब आणि वैयक्तिक टॅक्समधील सुधारणांबद्दल बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'पंतप्रधान मोदींना नेहमीच वैयक्तिक कर प्रणाली सुलभ करायची होती. कोणत्याही मोठ्या दस्तऐवजांची गरज नसावी असे त्यांना वाटत होते. त्या पुढे म्हणाल्या की, सुमारे 50% करदाते नवीन कर प्रणालीची निवड करतील.

Nirmala Sitharaman Interview On Budget 2023 : 'गेमचेंजर ठरणार पीएम विकास योजना...', अर्थमंत्र्यांचे भाष्य 

80C आणि 80D म्हणजे काय?

जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये अनेक प्रकारच्या सवलतींचा क्लेम करू शकता. 80C अंतर्गत 1.5 लाख सूट, 80D अंतर्गत 25 हजार सूट. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे एखादी व्यक्ती टॅक्समध्ये सूट मागू शकते. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये सरकारने सांगितले की, तुम्ही सूट क्लेम करू नका, आम्ही तुमचा टॅक्स स्लॅब वाढवतो, ज्यामध्ये तुम्हाला कमी कर भरावा लागेल.

First published:

Tags: Budget 2023, Nirmala Sitharaman